वनविभागाच्या जागेत फाशीच्या डोंगराभोवती २०१५ साली नाशिकरांच्या उपस्थितीत वनमहोत्सव जागतिक पर्यावरण दिनी पार पडला. यावेळी एका दिवसात येथे हजारो हात वृक्षलागवडीकरिता एकत्र आले होते. तब्बल ११ हजार भारतीय प्रजातीच्या रोपांची यावेळी लागवड झाली. तेव्हापासून आजतागायत येथे सातत्याने वृक्षरोपण आणि संवर्धनावर भर दिला जात आहे. तीन वर्षांपूर्वी देवराईमध्ये भर पडली ती १ हजार रानवेलींची. तसेच विविध औचित्यावर वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी येथे येऊन श्रमदान तर केलेच मात्र या सहा वर्षांत रोपे लागवडीलाही हातभार लावला. यामुळे येथील रोपांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नियोजनबद्ध लागवड, शास्त्रीय पद्धतीचा अवलंब, मुबलक खत, पाणी आणि प्रामाणिक कष्टाच्या जोरावर येथे नाशिककरांची हक्काची देवराईची निर्मिती होत आहे.
---इन्फो--- घन वनासाठी पाच क्षेत्र देवराईमध्ये दाट वृक्षराजी साकारण्याकरिता अर्धा ते एक एकरचे पाच क्षेत्र निवडण्यात आले आहेत. या क्षेत्रांवर त्या पद्धतीने खड्डे करत जास्त वाढणारे रोपे, मध्यम वाढणारी रोपे आणि झुडुपांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशनिष्ठ रोपे अभ्यासपूर्ण पद्धतीने येथे लागवड केली जात आहे. जेणेकरून रोपे वाढल्यानंतर या पाच जागांवर दाट वृक्षराजी बहरलेली दिसून येईल, हा यामागील उद्देश आहे.
--इन्फो-- १५० कंदमुळांची पडणार भर पर्यावरण दिनी देवराईमध्ये १२ प्रजातीची १५० कंदमुळांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये अमरकंद, चाई, करटुळे, लुंढी, विदारीकंद, जंगली कांदा, कंदफळ यांसारख्या प्रजातींचा समावेश आहे. कंदमुळांना जास्त पाण्याची गरज भासत नाही. मातीचा पोत सुधारण्यास व सुपीकता अधिक वाढविण्यासाठी कंदमुळांची लागवड महत्त्वाची ठरते. त्र्यंबकेश्वर, हरसूल, मोखाडा, कर्जत, तोरणमाळ येथून कंदमुळांची रोपे संकलित करण्यात आली आहेत.
---कोट---
दरवर्षी देवराई, वनराईमध्ये पर्यावरणपूरक नवनवीन प्रयोग राबविले जातात. परिपूर्ण अशी समृद्ध जैवविविधता विकसित करण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत. पुढील पाच वर्षांत निसर्ग अभ्यासाचे उत्तम असे केंद्रस्थान या रूपाने नाशिकला मिळेल असा विश्वास आहे. वृक्षप्रेमी दानशूर सामाजिक, व्यावसायिक संस्था, व्यक्तींकडून होणारे अर्थसाहाय्य या प्रकल्पांचा मोठा आधार आहे.
- शेखर गायकवाड, अध्यक्ष, आपलं पर्यावरण संस्था (फोटो आर वर ०३ शेखर नावाने)
===Photopath===
030621\374903nsk_52_03062021_13.jpg
===Caption===
शेखर गायकवाड, प्रतिक्रियेसाठी फोटो