शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील वारकऱ्यांना मफलरचे वाटप

By admin | Updated: January 17, 2017 23:31 IST

खामखेडा ते त्र्यंबकेश्वर दिंडीतील वारकऱ्यांना मफलरचे वाटप

खामखेडा : येथून लायकेश्वर  ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी पालखीचे त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान झाले.  गेल्या दहा वर्षांपासून खामखेडा येथील श्रीक्षेत्र लायकेश्वर  येथून त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी  सोहळा दिनानिमित्ताने स्वर्गीय  महादू तारू (बाबा) यांच्या कृपाशीर्वादाने व दिंडीचे संस्थापक गोरख शेवाळे, माजी सैनिक  जयराम शेवाळे, सुभाष बिरारी आदिंच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन करण्यात  येते.  लायकेश्वर येथे निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या  दिंडीचे खामखेडा गावाच्या चौफुलीवर भव्य स्वागत करण्यात आले. सध्या थंडीचे दिवस असल्याने गुरुदत्त पुरु ष गटाच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांना मफलरचे वाटप करण्यात आले.  यावेळी देवळा पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विनोद देवरे, सोमनाथ जगताप, मिलिंद पगार, वसाका संचालक अण्णा पाटील, उपसरपंच संतोष मोरे, सुनील शेवाळे, विश्वास शेवाळे, सोसायटीचे चेअरमन नानाजी मोरे, गुरु दत्त पुरु ष गटाचे अध्यक्ष महेश शिरोरे, सुनील शेवाळे, नारायण शेवाळे, किरण चिमनपुरे, दत्तू भदाणे, जितेंद्र अहेर, सुभाष बिरारी आदि उपस्थित होते. सदर दिंडी खामखेडा येथून पिळकोस, बगडू, भेंडी, दह्याणे, कुडाने, बाबापूर, मावडी, बोपेगाव, पालखेडा, मोहाडी, शिवनई, म्हसरूळ, नाशिक मार्गे त्र्यंबकेश्वर येथे जाणार आहे.  या पायी दिंडी सोहळ्यातील भाविकांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था बगडू, कुंडाणे, मावडी, पालखेड, शिवनई, नाशिक, महिरावणी आदि ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे, तर सायंकाळच्या भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था दह्याणे, बाबापूर, बोपेगाव, मोहाडी, म्हसरूळ, पिपळगाव आदि ठिकाणच्या गावातील नागरिकांनी केली  आहे. (वार्ताहर)