शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नववसाहतीत जलवाहिनीच्या काम रस्त्यांवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 16:01 IST

सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्दे सटाणा शहरात रोज होताहेत दुचाकीचे अपघात

सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली जात आहे.पालिकेच्यावतीने पुनंद पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील अभिमन्यू नगर व क्र ांतीनगर या नववसाहतीत अनेक ठिकाणी चांगले रस्ते फोडुन जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यातच पावसाळा असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बरीच वाहने चिखलात फसून जातात तर काही चिखलातून मार्गक्र मण करतांना वाहने घसरून अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे स्थानिक रहिवाशांबरोबरच बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी अभिमन्यु नगर व क्र ांतीनगर मधील स्थानिक रहिवासी विजय वाघ, भालचंद्र कोठावदे, शरद नदाळे, काशिनाथ सूर्यवंशी, रतीलाला बागुल, प्रशांत कोठावदे, शिवदे, लांडगे आदींच्या वतीने रस्ता सुरळीत व्हावा म्हणून मुरूम टाकण्याची मागणी केली जात आहे.दुरु स्तीसाठी टोलवाटोलवी ...नववसाहतीमधील रहिवाशी विजय वाघ यांनी अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यांच्याकडून सांगण्यात आले की या रस्त्यावर संबंधित ठेकेदार मुरूम टाकून रस्ता सुरळीत करतील. याबाबत ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांच्याकडुन सांगण्यात आले की आमच्याशी असे कुठल्याही प्रकारचे बोलणे झाले नसुन आम्ही मुरूम टाकू शकत नसल्याचे सांगून इन्कार केला आहे. पालिका प्रशासन आणि ठेकेदाराच्या टोलवाटोलवीमुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत