शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा ‘पडला उजेड’पहिल्याच पावसात

By admin | Updated: May 10, 2016 00:34 IST

दाणादाण : तब्बल दहा तास वीज यंत्रणा विस्कळीत

नाशिक : मान्सूनपूर्व पावसामुळे वीज वितरण कंपनीचे पितळ उघडे पडले असून खिळखिळीत झालेली वीज वितरण प्रणाली आणि अभियंत्यांचा निष्काळजीपणा या पावसामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसामुळे तब्बल दहा तास शहरातील वीज वितरण व्यवस्था विस्कळीत झाली होती. सोमवारपर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात होताच शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित झाला होता. नेमके काय झाले आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होणार, याची माहिती देणारी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. जनसंपर्क अधिकारी नसल्यामुळे मुख्य अभियंत्यांसह कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंतादेखील हतबलता दर्शवित असून ग्राहकांचे समाधान करणारी माहिती अथवा उत्तरे देतानाही अधिकारी चाचपडत असल्याने या अभियंत्यांकडे नेमके अधिकार तरी काय आहेत, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तब्बल ४० पेक्षा अधिक फिडर बंद पडले होते. तर पाच सबस्टेशनदेखील बंद पडल्याने शहराचा मोठा भाग अंधारात होता. मात्र काल याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. विस्कळीत वीज यंत्रणेचा सर्वाधिक फटका सातपूर सबस्टेशनवरील ग्राहकांना बसला. (प्रतिनिधी)