शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बंद ऑक्सिजन प्रकल्पाला मिळाली महावितरणची ‘ऊर्जा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

देश व राज्यात ऑक्सिजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला या बंद प्रकल्पाची गरज दाखवून दिली. त्यामुळे राज्य ...

देश व राज्यात ऑक्सिजन टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला या बंद प्रकल्पाची गरज दाखवून दिली. त्यामुळे राज्य ऊर्जा खात्याने माणुसकीच्या नात्याने वीज बिलात सवलत देऊन वीज कनेक्शन जोडून दिले. बंद असलेला सदर ऑक्सिजन प्रकल्प पुन्हा कार्यान्वित झाल्याने सिन्नरसह नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन टंचाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्सिजन निर्मितीच्या बाबतीत सिन्नर औद्योगिक वसाहत आघाडीवर आहे. गेल्या १५ दिवसांपासून राज्यासह नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात ऑक्सिजनचा कच्चा माल कमी प्रमाणात मिळू लागल्याने सिन्नरच्या विविध ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांकडून पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नव्हते. त्यामुळे सिन्नरसह नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची टंचाई भासू लागली होती. कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असल्याने ब्राह्मणवाडे येथील इलेक्ट्रॉनिक ऑक्सिजन प्रकल्पाच्या थकीत वीज बिलात काही प्रमाणात सवलत देऊन तो प्रकल्प पुन्हा सुरू होणे गरजेचे असल्याचे स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह निफाडचे आमदार दिलीप बनकर, नाशिकरोड-देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

आमदार दिलीप बनकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत ताबडतोब या प्रकल्पाचा वीज पुरवठा जोडून दिला. त्यानुसार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहेर व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज सुमारे ६०० जम्बो सिलिंडर भरून दिले जाणार आहे.

कोट....

सदर ऑक्सिजन प्रकल्पाचा वीज पुरवठा बिल थकल्याने बंद असल्याचे समजले. राज्यात व नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन टंचाई आहे. या तीन वर्षांपासून बंद असलेल्या प्रकल्पाचे वीज कनेक्शन जोडून दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळणार आहे.

- प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री

कोट....

सदर प्रकल्प सुरू झाल्याने नाशिक जिल्ह्यातील ऑक्सिजन संकट दूर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा केला. श्रेयवादाच्या लढाईत कोणी पडू नये. माणूस जगला पाहिजे, कोणीही याचे राजकीय भांडवल करू नये. श्रेय कोणालाही द्या. मात्र ऑक्सिजनचे संकट दूर होऊन माणूस जगेल हे महत्त्वाचे आहे. राज्य सरकारचे या निर्णयाबद्दल आभार मानतो.

- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

फोटो - २९ सिन्नर ऑक्सिजन-३

सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथे बंद असलेला ऑक्सिजन प्रकल्प थकीत वीज बिलात सवलत देऊन पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रकल्पाची पाहणी करताना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे.

===Photopath===

290421\29nsk_26_29042021_13.jpg

===Caption===

 फोटो - २९ सिन्नर ऑक्सीजन-३सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे बंद असलेला ऑक्सीजन प्रकल्प थकीत वीजबिलात सवलत देऊन पुन्हा कार्यान्वित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रकल्पाची पाहणी करताना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार दिलीप बनकर, सरोज अहिरे.