शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक प्रशिक्षणासाठी एमएसबीटीई, निमाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:34 IST

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.

नाशिक : पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात नोकरी किंवा उद्योग उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व नाशिक इंडस्ट्रीज मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व उद्योगधंदे यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी निमाची इंडस्ट्री हब म्हणून निवड करण्यात आली असून के. के. वाघ पॉलिटेक्निकची हब इन्स्टिट्यूट म्हणून निवड करण्यात आली आहे.निमाच्या पुढाकारातून निमा हाऊस येथे नाशिक जिल्ह्यातील सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांची महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्या औरंगाबाद विभागाचे सहायक सचिव प्रा. डी. आर. दंडगव्हाळ व किशोर मोहिते यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी दंडगव्हाळ यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील संधी प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी उपस्थितांना मार्गदशन केले, तर निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी उद्योग क्षेत्राची शिक्षण संस्थांकडून असलेली अपेक्षा व्यक्त केली. यावेळी निमाचे तुषार चव्हाण, नितीन वाघसकर, कैलास अहेर यांनी औद्योगिक क्षेत्रात आवश्यक तंत्रकुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची क्षमता शिक्षण संस्थांमध्ये आहे. त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रवि महादेवकर यांनी ट्रेनिंगचे मॉडेल तयार करण्यासाठी प्राचार्यांना विविध सूचना केल्या. सहकारी संस्थातर्फे बीएसएनएल ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य प्रा. के. डी. गांगुर्डे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी. एस. सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सुविधा देण्याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रकाश कडवे यांनी प्रास्ताविक करताना एमएसहीटीई व निमाचे उद्धिष्ट स्पष्ट केले. प्रा.राजेंद्र नारखेडे यांनी सूत्रसंचालक करून आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी