शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 01:23 IST

सुरगाणा : अजूनही बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ते त्वरित करावेत.या अस्मानी संकटात शेतकरी सापडल्याने हतबल झाला असून त्याच्या ...

ठळक मुद्देनुकसान भरपाई सुद्धा शासनाकडूनत्वरित मिळायला हवी.

सुरगाणा : अजूनही बऱ्याच ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. ते त्वरित करावेत.या अस्मानी संकटात शेतकरी सापडल्याने हतबल झाला असून त्याच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाल्याने तो मेटाकुटीस आला आहे कोणत्याही प्रकारच्या अटी शर्थी न ठेवता सरसकट पंचनामे करावेत.त्यांना झालेली नुकसान भरपाई सुद्धा शासनाकडूनत्वरित मिळायला हवी. याचा पाठपुरावा मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे करणार असल्याचे खासदार डॉ.भारती पवार यांनी पाहणी दरम्यान शेतक-यांना सांगितले.

तालुक्यात अवकाळी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी भाताच्या आवणात गुडघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भाताच्या आंगरी(ओंब्या) पाण्यात भिजल्याने काही ठिकाणी आवणातच कोंब फुटले आहेत. भात भिजल्याने दाणे खराब झाल्याने तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा निघतो.त्यामुळे भाव देखील मिळत नाही.हातातोंडाशी आलेली पिके ही ह्या अतिवृष्टीमुळे खराब झाली असून शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.  यावेळी खासदार भारती पवार यांनी तालुक्यातील करवंदे, दुर्गापूर, हट्टी,शिंदे दिगर,आदी गावातील नुकसान झालेल्या शेतावर जाऊन पाहणी केली.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील भोये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश थोरात, भाजपा राज्य आदिवासी आघाडी कार्यकारिणी सदस्य विठ्ठल गावित, नगरसेविका रंजना लहरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन महाले, नगरसेवक ज्ञानेश्वर कराटे, बाळासाहेब सुर्यवंशी, दीपक खोत, विजय देशमुख, देवाजी चव्हाण आदी उपस्थीत होते.तालुक्यात करवंदे येथील शेतकरी बुधा देवाजी चव्हाण यांच्या भात शेतीच्या नुकसानीची पाहणी करतांना डॉ. भारती पवार,  सुनिल भोये, रमेश थोरात आदीसह कार्यकर्ते. 

टॅग्स :Member of parliamentखासदारagricultureशेती