शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:24 IST

शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे, अशी अनुकूल भूमिका आयुक्तांनी घेतल्याने बससेवा ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.

नाशिक : शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे, अशी अनुकूल भूमिका आयुक्तांनी घेतल्याने बससेवा ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळामार्फत शहर बससेवा चालविली जात आहे. परंतु, शहर बससेवा तोट्यात जात असल्याने महामंडळाने आजवर वारंवार बससेवा बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत अनेक मार्गांवरील बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या एप्रिलनंतर बससेवा पूर्णपणे बंद करण्याचा अल्टिमेटमही महामंडळाने दिला आहे. या साºया पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी त्यासंदर्भात एजन्सीसमवेत तांत्रिक बोली प्रक्रिया राबविली जाणार आहे. सदर सल्लागाराला तीन महिन्यांचा अवधी दिला जाणार असून, त्याच्याकडून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. आयुक्तांनी सांगितले, सध्या महापालिकेमार्फत बसथांबे उभारले जातात आणि त्याचा वापर परिवहन महामंडळाकडून केला जातो. अशा बºयाच गोष्टी आहेत. त्यामुळे बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे. परंतु, बससेवा चालविणे तितके सोपेही नाही. त्याला अनेक तांत्रिक कंगोरे आहेत. सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करूनच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.