शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांच्या समर्थनार्थ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 22:41 IST

रास्ता रोको : कळवण, चांदवड, सटाणा, नांदगाव येथे निषेध मोर्चे

कळवण : माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्त वसुली संचालनालयने सोमवारी अटक केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस, महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने मंगळवारी दुपारी १ वाजता कळवण बसस्थानकाजवळ रस्ता रोको आंदोलन केले.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार, शहराध्यक्ष जितेंद्र पगार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे कळवण- नाशिक व कळवण-देवळा रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी सांगितले की, राज्य सरकार राजकारण करून सूडबुद्धीने भुजबळ परिवारावर कारवाई करत असून, सक्त वसुली संचालनालय, एटीएस सारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. यावेळी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, राष्ट्रवादीचे कळवण विधानसभा अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या कारवाईबाबत शासनावर टीका केली. आंदोलनात साकाचे माजी संचालक कृष्णा बच्छाव, जितेंद्र पगार, अमोल पगार, विलास रौंदळ, संजय पगार, जयेश पगार, सागर खैरनार, रामा पाटील, भूषण बच्छाव, कौतिक गांगुर्डे, कैलास बच्छाव, दीपक वाघ, दीपक जाधव, सतीश गांगुर्डे, चेतन शिंदे, अमित देवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.चांदवड : येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मुंबई-आग्रारोडवर अर्धातास रास्ता रोको करण्यात येऊन तहसीलदार माणिक अहेर यांना निवेदन देण्यात आले. माजी खासदार समीर भुजबळ यांना राजकीय सूडापोटी अटक केली आहे. त्यांचा महाराष्ट्र सदन घोटाळ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतानाही छगन भुजबळ, समीर भुजबळ यांना विनाकारण यात गोवले जात असल्याचा आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉँग्रेस चांदवड तालुका यांनी केला आहे. भाजपा व त्यांचा मित्रपक्ष सरकारचा जाहीर निषेध केला. सदर आरोप सरकारने तत्काळ मागे घेण्यात यावे व भुजबळ परिवाराला निर्दोष मुक्त करावे अन्यथा चांदवड तालुका अखिल भारतीय समता परिषदेतर्फे तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, बाळासाहेब माळी, तालुकाध्यक्ष उत्तम अहेर, डॉ. ए. पी. निकम, विनोद माळी, तुकाराम सोनवणे, राजाभाऊ शेलार, नवनाथ अहेर, नंदू मंडलिक, कैलास खैरे, किशोर शेलार, शांताराम गांगुर्डे, देवीदास शेलार, किशोर सोनवणे, दीपक खैरे, सुनील क्षीरसागर, पंडित माळी, सागर अहेर, अंबादास सोनवणे, धोंडीराम खैरे, विठ्ठल पगार, अशोक सोनवणे आदिंसह समता परिषद व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होेते. नांदगाव : येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. आमदार पंकज भुजबळ यांचे संपर्क कार्यालय असलेल्या मालेगाव रस्त्यावरील व्ही. टी. संकुलच्या बाहेर हे आंदोलन केले. आंदोलनामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी चाळीसहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत ताब्यात घेऊन त्यांची मुक्तता केली. साहेबराव पाटील, तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, नगराध्यक्ष शैलेजा गायकवाड, नगरसेवक शिवाजीराव पाटील, इंदिरा बनकर, विश्वास आहिरे, इकबाल शेख, विजय पाटील, राजेंद्र लाठे, माजी नगरसेवक राजेंद्र गायकवाड, महेंद्र गायकवाड, सुरेश गायकवाड, नारायण पवार, उपसरपंच अतुल पाटिल, मधुकर बोरसे, देवदत्त सोनवणे आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)