शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

By admin | Updated: September 8, 2016 00:39 IST

गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

 कळवण : गणेशोत्सव व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कळवण पोलीस स्टेशनच्या वतीने कळवण शहरातून संचलन करण्यात आले. सार्वजनिक उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या रुट मार्च चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस स्टेशनपासून निघालेला हा रुट मार्च मेनरोड, गणेशनगर, बसस्थानक, फुलाबाई चौक, शाहीर लेन, गांधी चौक, मेनरोड यामार्गे निघून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांतता अबाधित राहावी, सर्वधर्मियांनी एकोप्याने सण साजरे करावेत त्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.या रु ट मार्चमध्ये कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, उपनिरीक्षक विनोद जाधोर, गडाख, हवालदार बबन पाटोळे, वाहतूक पोलीस आर.जी. जाधव आदींसह महिला व पुरु ष पोलीस कर्मचारी, होमगार्ड, समादेशक अधिकारी पवार व सर्व महिला आणि पुरु ष होमगार्ड सहभागी झाले होते.कळवण शहरात १३ रस्ते असून गणेशनगर, शिवाजीनगर, मेनरोड, पेट्रोलपंप, स्टेट बँक, एसटी बसस्थानक, महाराजा चौक , कळवण पोलीस स्टेशन परिसर, फाशी चौक, सुभाष पेठ आदिंसह शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कळवण शहरात येणारा, जाणारा आणि प्रत्येक गणेशभक्त कैद होणार आहे.दिवस-रात्र हे कॅमेरे सुरु राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. (वार्ताहर)