शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे गोदावरीपात्रात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:16 IST

मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरु वात केली आहे. या आंदोलनाची सूत्र आता महिलांनी हाती घेतली असून, शुक्रवारी (दि.२७) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमध्ये गनिमी काव्याने आंदोलनाला सुरु वात केली आहे. या आंदोलनाची सूत्र आता महिलांनी हाती घेतली असून, शुक्रवारी (दि.२७) गोदावरी नदीपात्रात उतरून आंदोलन केले. तर काही महिलांनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करून सरकारविरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.  नाशिक जिल्ह्यात मराठा क्र ांती मोर्चाचे आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने सुरू असताना प्रशासनाने ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारत मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांना आंदोलन करू नये यासाठी नोटिसा पावविल्याने महिला समन्वयकांनी आंदोलनात पुढाकार घेत आंदोलनाची धुरा सांभाळली आहे. मराठा क्र ांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनच आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गुरुवारी (दि.२६) यापुढे नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचे नेतृत्व महिला सांभाळणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्र वारी सकाळी महिलांनी गोदावरी परिसरात आंदोलन करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यास गुुरुवारी प्रतिबंध करण्यात आला होता. त्यामुळे आंदोलकांनी सत्र न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आवारात ठाण मांडून आंदोलनास सुरु वात केली. येथेही सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. त्यामुळे शुक्र वारपासून गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला असून, आंदोलनासाठी प्रशासन जागा आणि परवानगी देत नाही. त्यामुळे आता आंदोलन कुठे आणि कसे सुरू आहे ते शोधा, असा इशारा मराठा क्र ांती मोर्चाने दिला होता. त्यामुळे पोलिसांची प्रशासनाची पुरुष समन्वयकांवर नजर होती. परंतु, मराठा क्रांती मोर्चाच्या महिलांनी शुक्रवारी बाणेश्वर मंदीर परिसरात माधवी पाटील व पूजा धूमाळ, मनोरमा पाटील या महिलांनी अचानक गनिमा कावा पद्धतीने गोदावरीच्या पात्रात उतरून आंदोलन करीत मराठा समाजाला  आरक्षणाची मागणी केली, तर मंगला शिंदे, शोभो सोनवणे, अरुणा डुकरे, अस्मिता देशमाने आदींनी बाणेश्वराला दुग्धाभिषेक करीत सरकारविरोधात घोषणाबाजी करून मराठा आरक्षणाची मागणी केली. दरम्यान, आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली.आमदारांच्या निवासस्थानी आजपासून ठिय्यामराठा क्र ांती मोर्चातर्फे शनिवारपासून (दि. २८) आमदारांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिकमधून मराठा क्रांती मोर्चातर्फे आतापर्यंत रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, जलसमाधी आंदोलन करण्यात आले असून, आता मराठा क्रांती मोर्चा भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी प्रथम ठिय्या आंदोलन करणार आहे. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने आमदारांच्या निवासस्थानाबाहेरील ठिय्या आंदोलनाची सुरुवात सानप यांच्या निवासस्थानापासून करण्यात येणार असून, शनिवारी सकाळी १० वाजता जुना आडगाव नाका, कृष्णनगर या ठिकाणी त्यांच्या कार्यालय व निवास ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्र ांती मोर्चातर्फे देण्यात आली आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा