शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासेस संचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटात गेल्या पंधरा महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने संचालक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासमोर ...

नाशिक : कोरोनाच्या संकटात गेल्या पंधरा महिन्यांपासून शहर व जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने संचालक, शिक्षक, कर्मचारी यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. क्लासेसला अद्याप परवानगी मिळालेली नसल्याने क्लासेस संचालकांची कुचंबणा होत असून, क्लासेस चालविण्यासाठी क्लास चालकांना परवानगी मिळावी यासाठी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेने हुतात्मा स्मारक परिसरात मंगळवारी (दि. २२) आंदोलन केले. दरम्यान, पोलिसांनी ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना क्लासेस सुरू करण्याच्या परवानगीसाठी निवेदन दिले.

नाशिक शहर व जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी मि‌ळावी यासाठी मंगळवारी नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे ठिय्या आंदोनल करण्यात येणार होते. परंतु, पोलीस प्रशासनाने आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र, संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद नियोजित वेळेत आंदोलनस्थळी जमल्याने पोलिसांनी त्यांना ठिय्या आंदोलन करण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी एकत्र येऊन शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला. यावेळेत पोलिसांनी आंदोलकांना पांगविल्यामुळे आंदोलकांनी पुन्हा सीबीएस परिसरात एकत्र येऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे, प्रकाश डोशी, उपाध्यक्ष अरुण कुशारे, विवेक भोर, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, कैलास देसले, लोकेश पारख, रवींद्र पाटील, सचिन जाधव, पराग घारपुरे, सचिन अपसुंदे, विष्णू चव्हाण, प्रमोद गुप्ता, सचिन शिंदे, किशोर डोंगरे, राहुल चौधरी, संतोष पवार, अमिर शेख, दिनेश राठोड, प्रमोद गुप्ता, धनंजय ढाकणे, दत्ता नेरकर, सागर सानप, महेश भोरे यांच्यासह अनेक क्लासेस संचालक आंदोलनात सहभागी झाले होते.

===Photopath===

220621\22nsk_18_22062021_13.jpg

===Caption===

नाशिक जिल्हा कोचिंग क्लास संघटनेतर्फे हुतात्मा स्मारक येथे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जयंतमुळे यांच्यासह प्रकाश डोशी, उपाध्यक्ष अरुण कुशारे, विवेक भोर, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर, कैलास देसले, लोकेश पारख, रविंद्र पाटील, सचिन जाधव आदी