नाशिक : उपनगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दिवसभर बारीक चिलटांचा त्रास, तर सायंकाळनंतर डासांच्या उपद्रवामुळे रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. उपनगर, गांधीनगर, आगर टाकळी आदि आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छता मोहीम, फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी न झाल्याने अस्वच्छता वाढली आहे. तसेच पावसाचेदेखील आगमन न झाल्याने दिवसभर बारीक चिलटांचा व सायंकाळनंतर डासांचा उपद्रव रहिवाशांना सहन करावा लागत आहे. यामुळे रोगराईचे प्रमाण वाढू लागले असून, सर्वच खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. शहरात काही ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी) चिलटे व डासांचा उपद्रव रोखण्यासाठी रहिवाशांना स्वत:च उपाययोजना करावी लागत आहे. मनपा आरोग्य व स्वच्छता विभागाने तसेच नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष देऊन परिसरात स्वच्छता मोहीम व धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
उपनगरला डासांचा उपद्रव
By admin | Updated: July 25, 2014 00:38 IST