शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरची काळी मैना वेधतेय लक्ष

By admin | Updated: May 20, 2017 01:14 IST

वणी :आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाऱ्या व डोंगरची काळी मैना म्हणून परिचित असलेल्या करवंद या फळाचे बाजारपेठेत आगमन झाले

 लोकमत न्यूज नेटवर्कवणी : उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी परिचित असलेल्या व आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाऱ्या व डोंगरची काळी मैना म्हणून परिचित असलेल्या करवंद या फळाचे बाजारपेठेत आगमन झाले असून, पळसाच्या पानाच्या द्रोणाबरोबर ग्लासमध्ये करवंद टाकून मापाच्या आधारे विक्र ी करण्यात येत आहे. साधारणत: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गरिबांचा मेवा म्हणून परिचित असलेल्या करवंदाचे आगमन होते. झाडही नाही, वेलही नाही मात्र लहानमोठे झुडुप असलेल्या करवंदाच्या जाळीला कुरपुड असे म्हणतात. दऱ्या-खोऱ्या व डोंगराळ भागात आढळणाऱ्या व उष्ण कटिबंधात येणाऱ्या करवंदाची चव चाखण्याची आवड लहानथोरांना असतेच. त्याच्या झुडुपाला लहान आकाराच्या सफेद फुलांचे गुच्छ येतात. याचा सुगंध मादक असतो. मध्यरात्रीनंतर व पहाटेच्या सुमारास मंद सुगंध येतो. आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाऱ्या करवंदाला वर्षातून एकदा बहार येतो. उन्हाची तीव्रता कमी करणाऱ्यऱ्या गोड-आंबट चवीच्या फळात द्विदल त्रिदल तुरीच्या आकारमानाचे बीज असते. विशेष म्हणजे, हे फळ हायब्रीड नाही व त्यावर संशोधन झाल्याचेही ऐकीवात नाही. दिंडोरी तालुक्यातील अहिवंत किल्ला, सुरगाणा तालुक्यातील केमचा डोंगर व कळवण तालुक्यातील रावळा जावळा डोंगराबरोबर सप्तशृंगीच्या पर्वतरांगात करवंदाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आढळते. डोंगराळ भागात माकडांचे वास्तव्य असते. दुसरी बाब म्हणजे करवंदाचे लाकूड दमदार असल्याने बहर संपल्यानंतर सरपण म्हणूनही त्याचा वापर करण्यात येतो. आदिवासी बांधव करवंदे विक्र ी करून संसारास हातभार लावतात. पळसाच्या पानाचे आकर्षक द्रोण तयार करून गावोगाव फिरून त्याची विक्र ी करतात. करवंद जेव्हा कच्च्या स्वरूपात असतात तेव्हा हिरव्या रंगाच्या करवंदाची चटणी चविष्ट व उष्णतामान कमी करण्यास साहाय्यभूत ठरत असल्याने पाककौशल्यात पारंगत गृहिणीवर्ग ती चटणी बनवतात. विशेष बाब म्हणजे, पावसाळ्यात या झुडुपाखाली बसल्यास पाण्याचा एकही थेंब लागत नाही. त्यामुळे गुराख्यांचे पावसाळ्यात निवाऱ्याचे व हक्काचे ठिकाण असून, पाण्यापासून बचाव करण्यासाठी कुरपुडच्या आश्रयाखाली गुराखी जातात.