शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या कुशीतून : पळविलेले बालक सापडले जंगलात दापुरेत नरबळीचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:19 IST

घोटी/त्र्यंबकेश्वर : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले.

ठळक मुद्देतिच्या कुशीतील बालक अज्ञातांनी चोरून नेलेमातेची आणि बालकाची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी

घोटी/त्र्यंबकेश्वर : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडले. या घटनेमागे नरबळीसाठी तर बालक पळविले नसावे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर काही वस्तू आढळल्या आहेत. सदर बालकावर त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे येथील पाचकुंडल्याची वाडी या आदिवासी वस्तीवरील मंगल चौधरीनामक महिला आपल्या चिमुकल्याला कुशीत घेऊन झोपली असता, रात्री २ वाजेच्या सुमारास तिच्या कुशीतील बालक अज्ञातांनी चोरून नेले. दरम्यान या मातेला जाग आली असता, आपल्याजवळ बाळ नसल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला. यावेळी घरातील सर्व सदस्य जागे झाले. त्यांनी बाळाचा सर्वत्र शोध घेतला असता हे बालक जंगलात मिळून आले. या बालकाला आणि मातेला उपचारार्थ त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकाराची माहिती समजताच श्रमजीवीसंघटनेचे भगवान मधे यांनी मातेची आणि बालकाची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात व परिसरात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असून, यामुळे नरबळी देण्याच्या घटनांत काही दिवसात वाढ झाली आहे. हा प्रकारही नरबळीसाठी केला नसावा ना याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे. ज्या ठिकाणी हे बालक सापडले त्या ठिकाणापासून काही अंतरावर कोंबडीचे पिलू, नारळ, वाटी असे साहित्यदेखील आढळून आले.