भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर असुरक्षिततेची जाणीव झाल्याने बिबट्याची मादी तिच्या नवजात बछड्यांची वेगळी झाली होती. बुधवारी (दि.२६) संध्याकाळी नाशिक पश्चिम वन विभागाच्या हद्दीत वडनेर येथील पोरजे मळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. या वेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले होते. पोरजे यांनी वन विभागाला माहिती कळविली. तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछडे सुदृढ असल्याची खात्री पटल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी ‘जैसे थे’ बछड्यांना ठेवण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास मादी बिबट्याने त्याठिकाणी येऊन आपल्या एका बछड्याला गुरुवारी पहाटेच्या सुमारास तोंडात धरून स्थलांतरित केले. मात्र, दुसऱ्या बछड्याला स्थलांतरित करण्यापर्यंत सूर्योदय झाल्याने मादी शेताकडे फिरकली नाही. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा मादी आली आणि तिने त्या बछड्यालाही जवळ घेत सुरक्षित अधिवास गाठला. यामुळे या बछड्यांना पुन्हा मायेची ऊब मिळाली.
--इन्फो--
कॅमेऱ्यात स्थलांतर बंदिस्त
इको-एको संस्थेच्या मदतीने वन विभागाने उसाच्या शेतात ३६० अंशात फिरणारा डिजिटल कॅमेरा बसविला होता. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याच्या बछड्यांच्या हालचालींवर रात्रभर वनकर्मचारी लक्ष ठेवून होते. मादी रात्री शेतात येत असताना तसेच एका बछड्याला सावधगिरीने तोंडात धरून पुन्हा जातानाचा प्रवास कॅमेऱ्यात बंदिस्त झाला. बछड्यांचा त्यांच्या मातेकडून केला जाणारा स्थलांतराचा प्रवास कॅमेऱ्याने अचूक टिपला. दोन वर्षांपूर्वीही अशाच पद्धतीने या भागात बछडे आढळून आले होते.
---
फोटो आरवर २९बिबट्या नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
290521\29nsk_38_29052021_13.jpg~290521\29nsk_39_29052021_13.jpg
===Caption===
बिबट्या मादी~बिबट्याच्या बछड्याला घेण्यासाठी आलेली यंत्रणा