नाशिक : रक्षाबंधनाच्या निमित्ताने केटीएचएम महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ विभागाच्या वतीने आधाराश्रमातील अनाथ व दिव्यांग मुलांना राखी बांधण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे (कनिष्ठ) सुमारे ४० स्वयंसेवक विद्यार्थिनींनी व महाविद्यालयाच्या शिक्षिका यांनी रक्षाबंधन कार्यक्र मात सहभाग घेतला. आधाराश्रमातील लहान मुलांना खूप आनंद झाला. तसेच स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलेल्या वृक्षांनाही राख्या बांधल्या. स्वयंसेवकांसमवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी व नाशिक विभागाचे समन्वयक प्रा. अशोक सोनवणे, प्रा. एस. एस. कदम, प्रा. आर. व्ही. निकम, प्रा. ए. जी. पानसरे, प्रा. आर. एन. सोनवणे, प्रा. व्ही. एन. चंद्रे, तसेच प्रा. कपिला कवडे, प्रा. आर. के. पाटील, प्रा. जयश्री वाघ, प्रा. बंगाळ, प्रा. श्रीमती नाठे, प्रा. वैशाली जाधव तसेच आधाराश्रमाचे अधीक्षक उपस्थित होते. महिला शिक्षकांनी यावेळी अनाथ आणि दिव्यांग बालकांना राखी बांधली.
आधाराश्रमातील बालकांना मिळाली बहिणीची माया
By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST