सिडकोतील सिंहस्थ नगर भागातील रहिवासी भागिरथी बाई उडपी या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर म्हातारपणी कोणीतरी सांभाळ करावा ह्या हेतूने त्यांच्याच नातेवाईकांचा मुलगा दत्तक घेतला. या दत्तक घेतलेल्या मुलाने वयोवृद्ध महिलेच्या नावावर असलेले घर व संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेत पोबारा केला होता. ती वृद्धा आजारी असल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना कळताच त्यांनी नगरसेविका किरण दराड़े व त्यांचे पती बाळा दराड़े यांच्याशी संपर्क साधून महिलेला दवाखान्यात दाखल केले होते. दरम्यान, वृद्धेच्या दत्तक मुलाशी संपर्क साधण्यात आला. त्यानुसार दत्तक मुलगा कमलाकर पाटील याने पुण्याहून येऊन आईला स्वीकारले. मुलगा आल्याचे पाहून आनंद झालेल्या आईच्या डोळ्यात पाणी तरारले.
कोट==
आईची सर्व मालमत्ता तिच्या नावावर करणार व शेवटच्या श्वासापर्यंत आईची सेवा करणार. माझ्याबद्द्ल गैरसमज करू नका.
-कमलाकर पाटील
आजीचा मुलगा
(फोटो ०३ )- भागिरथीबाई या महिलेला रुग्णालयातून बरे झाल्यानंतर घरी घेऊन जाताना बाळा दराडे तसेच दत्तक घेतलेला मुलगा कमलाकर पाटील आदी.