नाशिक : नाशिक तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींच्या जागा बिनविरोध निवडून आल्या असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारच न मिळाल्याने काही जागा रिक्त राहिल्या आहेत. सोमवारी ग्रामपंचायत निवडणूक अर्जांची छाननी करण्यात आली असता, एकमेव अर्ज बाद ठरविण्यात आला. बुधवारी माघारीची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होईल; मात्र काही ठिकाणी एका जागेसाठी एकच अर्ज आल्यामुळे तेथे बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यात लहवित येथे मोहन बळवंत काळे, गणेशगाव ग्रामपंचायतीत सत्यभामा अमृता डहाळे यांची निवड करण्यात आली. रायगडनगर ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी चार जागांवरच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, तर राखीव जागांवर एकही अर्ज न आल्याने त्या रिक्त ठेवण्यात आल्या. या चारही जागांवर एकनाथ गहिरे, रेश्मा रामनाथ गहिरे, सखाराम मुरलीधर गहिरे, काळू राघो गहिरे हे बिनविरोध निवडून आले. दरीतून अनिता केशव तिडके, तर आंबेबहुला येथून प्रशांत अशोक देशमुख व ज्योती शिवराम सहाणे यांची बिनविरोध निवड झाली. संसरीतून वनिता संजय जगताप, शिवणगावमधून बाळू यादव झोले, बेलतगव्हाणमधून संगीता अनिल धुर्जड, रवींद्र प्रभाकर दोंदे व राहुरीतून लक्ष्मीबाई मनोहर निरभवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
बहुतांशी ग्रामपंचायतींच्या जागा बिनविरोध
By admin | Updated: November 10, 2014 23:50 IST