शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक उमेदवार

By admin | Updated: November 17, 2016 23:35 IST

औद्योगिक वसाहतीत सर्वाधिक उमेदवार

सिन्नर : उपनगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या व औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांच्या प्रभाग ११ ब मध्ये कामगार नेत्यांमध्येच वर्चस्वासाठी बहुरंगी लढत होत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण जागेसाठी या प्रभागात शहरातील सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत. जवळपास सर्वच पक्षांचे उमेदवार या प्रभागात आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग ११ ब च्या सर्वसाधारण जागेसाठी शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे व दोन अपक्ष असे सर्वसाधारण जागेसाठी शहरातील सर्वाधिक म्हणजे सात उमेदवार रिंगणात असल्याने लढत बहुरंगी होत आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे पालिका निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असताना प्रभाग ११ ब मध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शिवसेनेने सोमनाथ पावसे, भाजपाने अनिल कर्पे, कॉँग्रेसने त्र्यंबक सोनवणे, राष्ट्रवादी कॉँग्रेसने वैभव ठाणेकर, मनसेने मंगल दीपक आरोटे यांना उमेदवारी दिली आहे, तर अनिल सरवार आणि मारुती कनकुटे हे अपक्ष उमेदवार पक्षीय उमेदवारांचा सामना करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विशेष म्हणजे, सर्वसाधारण जागेसाठी होत असलेल्या या प्रभागातील निवडणुकीतील सर्व उमेदवार नवखे आहेत. या सर्वांनी यापूर्वी कधीही नगरपालिका निवडणूक लढवली नाही. नव्या दमाच्या या उमेदवारांमध्ये मोठा उत्साह असून, या बहुरंगी लढतीकडे सिन्नरकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बहुतांश उमेदवार कामगार प्रतिनिधी असून, त्यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण अंगी ठासून भरले असल्याने त्यांच्यात चुरस आहे. शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ पावसे आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. संजीवनीनगर भागात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर उभारणी, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा दरवर्षी गुणगौरव, उपनगरांमध्ये स्वखर्चातून अनेक विकासकामे, मोफत आरोग्य शिबिरे, महिलांसाठी रोजगार निर्मिती, उन्हाळ्यात स्वत:च्या टॅँकरद्वारे मोफत पाणीवाटप आदिंसह विविध सामाजिक उपक्रमात पावसे अग्रभागी राहिले आहेत. (वार्ताहर)