शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नमाज, कुराणपठणासाठी मशिदी गजबजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:53 IST

रमजान पर्वला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत दोन उपवास पूर्ण झाले आहेत. रमजाननिमित्त शहर व परिसरातील मशिदींमध्ये पहाटेपासून सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळत आहे. नमाजपठण, कुराणपठणासाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी होत आहे.

नाशिक : रमजान पर्वला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत दोन उपवास पूर्ण झाले आहेत. रमजाननिमित्त शहर व परिसरातील मशिदींमध्ये पहाटेपासून सुरू होणारी लगबग रात्री उशिरापर्यंत पहावयास मिळत आहे. नमाजपठण, कुराणपठणासाठी समाजबांधवांची मशिदींमध्ये गर्दी होत आहे.  रमजान पर्वाची एकूण तीन खंडात विभागणी करण्यात आली आहे. कृपाखंड, मोक्षखंड, नरकापासून मुक्ती प्रत्येक खंड दहा दिवसांचा असल्याची माहिती धर्मगुरू देतात. सध्या रमजानचा पहिला खंड सुरू आहे. रमजान पर्वला अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात मुस्लीमबांधव अधिकाधिक वेळ धार्मिक कार्यासाठी देताना दिसून येतात. यंदा मे महिन्याच्या पंधरवड्यातच रमजान पर्व आले असून, सुमारे पंधरा तासांचा निर्जळी उपवास (रोजा) समाजबांधवांकडून केला जात आहे. पहाटे तीन वाजताच मुस्लीम बहुल परिसर जागा होत असून, सकाळी उपवास ठेवताना अल्पोपहार घेण्याची प्रथा आहे. या प्रथेलाच ‘सहेरी’चा विधी असे म्हटले जाते. जुने नाशिकमधील नानावली, कथडा, बागवानपुरा, चौकमंडई, नाईकवाडीपुरा, कोकणीपुरा, मुलतानपुरा या परिसरासह वडाळागाव परिसरातही पहाटे अडीच वाजेपासूनच काही युवकांचे ग्रुप विविध मुस्लीम बहुल भागात जाऊन ‘सहेरी’साठी समाजबांधवांना जागे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी डफलीचा वापर करत धार्मिक काव्यपंक्तीचे एका आवाजात पठणावर पहाट जागविणारे युवक भर देत आहेत. जुन्या नाशिकमधील शहीद अब्दुल हमीद चौकात रमजानच्या हंगामातील ‘मिनी मार्केट’ थाटले आहे. या बाजारात संध्याकाळी पाच वाजेपासून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसून येते. विविध प्रकारची फळे, खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या विविध खाद्यपदार्थ व फळांना मागणी वाढली आहे.ओल्या खजूरचे विविध प्रकार बाजारातउपवास सोडण्यासाठी प्राधान्याने ओली खजूर समाजबांधवांकडून प्रथमत: सेवन केली जाते. यामागे धार्मिक प्रथा पाळणे हा उद्देश जरी असला तरी खजूरच्या माध्यमातून शरीराला मिळणारी प्रथिने, लोह व ऊर्जा देणे हा शास्त्रीय उद्देशही असतो. दिवसभरच्या निर्जळी उपवासामुळे शरीरात आलेला थकवा घालविण्यासाठी ओली खजूर या महिन्यात अधिक सेवन केली जाते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर ओल्या खजूरची उलाढाल होताना दिसून येत आहे. ओल्या खजूरचे वेगवेगळे प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. तीस रुपये तर तीनशे रुपये असा पावकिलोचा भाव आहे. खजूरचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.

टॅग्स :Muslimमुस्लीम