शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी वाढीचा फेरप्रस्ताव

By admin | Updated: June 1, 2017 02:00 IST

प्रशासनाने पुन्हा एकदा घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मागील पंचवार्षिक काळातील स्थायी समितीने यापूर्वी घरपट्टी व पाणीपट्टीचा प्रस्ताव फेटाळला असताना आणि विद्यमान स्थायी समितीनेही सन २०१७-१८ साठी अंदाजपत्रक सादर करताना कोणतीही करवाढ न करण्याचे धोरण स्पष्ट केल्यानंतरही प्रशासनाने पुन्हा एकदा घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवला आहे. मात्र, कर वसुली विभागामार्फत आतापर्यंत ४ लाख १० हजार पैकी ३ लाख ४० हजार घरपट्टी बिलांचे वाटप जुन्याच दराने केले गेले असल्याने स्थायीने करवाढीचा निर्णय घेतला तरी तो पुढील वर्षापासूनच लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यापूर्वी प्रशासनामार्फत घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, तत्कालीन समितीने दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर, स्थायी समितीला आयुक्तांनी अंदाजपत्रक सादर करताना घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ सुचविली होती. त्यावर, स्थायी समितीचे विद्यमान सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सुरुवातीला घरगुतीऐवजी व्यावसायिक घरपट्टी आकारणीत दरवाढ करण्याचे सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात अंदाजपत्रक महासभेला सादर करताना सभापती गांगुर्डे यांनी यावर्षी कोणतीही दरवाढ केली नसल्याचे आपल्या भाषणात स्पष्ट केले. याच महासभेत भाजपाचे दिनकर आढाव यांनी करवाढ करणे आवश्यक असल्याचे सांगत समर्थन केले होते. अंदाजपत्रकीय महासभा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने पुन्हा एकदा घरपट्टी व पाणीपट्टीत दरवाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला आहे. स्थायी समितीने सदरच्या प्रस्तावाला मान्यता दिली तरी त्याची अंमलबजावणी मात्र पुढील वर्षापासूनच करावी लागणार आहे. महापालिकेच्या करविभागाने आतापर्यंत ४ लाख १० हजार घरपट्टी बिलांपैकी ३ लाख ४० हजार बिलांचे वाटप पूर्ण केले आहे. सदर बिले ही सध्याच्याच दराने वाटप करण्यात आलेली आहे त्यामुळे स्थायीने मान्यता दिली तरी त्याची अंमलबजावणी या वर्षात होऊ शकणार नाही. सत्ताधारी भाजपा नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागून असणार आहे.