शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हगणदारीमुक्तीसाठी कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:33 IST

नाशिक : आदिवासी भागात वन संपदेचे जतन करणाºया दिंडोरी तालुक्यातील शृंगारपाडा येथे राज्यपाल भेट देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगून गाव ...

ठळक मुद्देशृंगारपाडा : अनुदान देण्यास अधिकाऱ्यांचे कानावर हात

नाशिक : आदिवासी भागात वन संपदेचे जतन करणाºया दिंडोरी तालुक्यातील शृंगारपाडा येथे राज्यपाल भेट देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगून गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी उधार, उसनवार करून त्यांना स्वखर्चाने शौचालय बांधण्यास प्रवृत्त करणाºया प्रशासनातील अधिकाºयांमुळे गावावर गेल्या दोन वर्षांपासून पाच लाखांचे कर्ज झाले आहे. शौचालय उभारणीसाठी साहित्य उधारीवर देणाºया व्यावसायिकांकडून वसुली साठी तगादा लावला जात आहे, काही ग्रामस्थांच्या वस्तू जप्तीची कारवाईही करण्यात आली आहे. तथापि, प्रशासनातील अधिकाºयांनी मात्र शौचालयाचे अनुदान देण्याबाबत कानावर हात ठेवला आहे.राज्यपाल वनजमिनींच्या सामूहिक दाव्यांची पाहणी करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात भेट देणार असल्यामुळे वन संपदेचे रक्षण करणाºया शृंगारपाडा या गावाची प्रशासनातील अधिकाºयांनी निवड केली. त्यासाठी गावात शासकीय अधिकाºयांची रेलचेल वाढल्यावर राज्यपालांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी शृंगारपाडा हे संपूर्ण गावच हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनातील अधिकाºयांनी ग्रामस्थांची मनधरणी करून त्यांना प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी गळ घातली. ग्रामस्थांनीही शासनाच्या या योजनेत सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली तथापि, शासनाकडे शौचालय अनुदान देण्यासाठी निधी नसल्याचे पाहून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ग्रामस्थांना उधार, उसनवारी करण्याचा सल्ला दिला व शासनाचे पैसे मिळताच तत्काळ निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ अधिकाºयांच्या शब्दाखातर ग्रामस्थांनी एकत्र येत सीमेंट, वाळू, पत्रे, शौचालयाचे भांडे अशा विविध वस्तू उधार, उसनवारी करून आणल्या व संपूर्ण गावातील प्रत्येकी १०५ घरे हगणदारीमुक्त केले. गाव हगणदारीमुक्त झाल्याची आकडेवारी सरकार दप्तरी नोंद करण्यात आली. राज्यपाल येणार म्हणून शासनाच्या अधिकाºयांनी शृंगारपाडा या संपूर्ण गावाला एक सारखा रंग देऊन आदर्श गाव निर्माण करण्यासाठी संपूर्ण गावाला शासकीय रंग पुरविला. तथापि, ग्रामस्थांनी आपली खरी वस्तुस्थिती राज्यपालांना कळावी म्हणून रंगरंगोटी करण्यास नकार दिला. दुर्दैवाने राज्यपालांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर सरकारी अधिकाºयांनी या गावाकडे पाठ फिरविली. आज दोन वर्षे उलटूनही शृंगारपाडा ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान मिळालेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले जात असून, आश्वासनापलीकडे त्यांना काहीच मिळालेले नाही. दुसरीकडे उसनवार दिलेल्या वस्तूंचे पैसे मिळत नसल्याने व्यावसायिकांकडून ग्रामस्थांचा छळ केला जात आहे.