शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण

By admin | Updated: November 17, 2014 00:40 IST

मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण

नाशिक : केंद्रात आता परिवर्तन होऊन अच्छे दिन आले आहेत, तर केंद्र सरकारने गोरक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करून त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी आणि गोहत्त्येसाठी मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी कायदा बनवावा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी मोरोपंत पिंगळे गो-सेवा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी बोलताना केली.शंकराचार्य संकुलात पुणे येथील गो-विज्ञान संशोधन संस्था आणि नाशिकचे श्री शंकराचार्य न्यास यांच्या वतीने आयोजित समारंभात राष्ट्रीय पुरस्कार उत्तरांचलातील पंडित गोविंद वल्लभ पंत विद्यापीठातील प्रा. डॉ. रामस्वरूप सिंह चौहान, क्षेत्रीय पुरस्कार मालेगाव येथील अखिल भारतीय कृषी गो-सेवा संघाचे अध्यक्ष केसरीमल मेहता यांना प्रदान करण्यात आला, तर स्थानिक गोपालक पुरस्कार जिल्ह्यातील आधारवड येथील काशीनाथ व त्र्यंबक वाघमारे, गोरक्षक पुरस्कार पिंपळगाव येथील संजय सोनवणे आणि सेंद्रिय शेतीबद्दल पुरस्कार खोडीपाडा येथील सम्राट राऊत तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार मोगरे (ता. इगतपुरी) येथील पांडुरंग जाखोरे यांना प्रदान करण्यात आला. हुकूमचंद सावला, रा. स्व. संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख भाऊराव पाटील, उद्योजक देवकिसन सारडा आणि बांधकाम व्यावसायिक नेमीचंद पोद्दार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी हुकूमचंद सावला यांनी सांगितले, गाय ही बिचारी नव्हे तर सामर्थ्यशाली आहे आणि सर्व समस्यांचे निदान आहे. शास्त्र, वेदांमध्ये गायीला अद्भुत जीव म्हटले आहे. गाय हीच माणसाला तारणार असून, सकारात्मक विचार आचरणात आणण्याचे आवाहनही सावला यांनी केले. भाऊराव पाटील यांनी मोरोपंत यांच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, मोरोपंत हे कल्पक व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम लोकसंग्राहक होते. गायीमधील विज्ञान त्यांनी लोकांना समजून सांगितले. गायीच्या आधारावरच हिंदुत्वाचे रक्षण व जागरण होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी पुरस्कारप्राप्त केशरीमल मेहता यांनी पंचगव्यात औषधी गुणधर्म असल्याचे सांगत बलसाडजवळ उभारण्यात आलेल्या रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जात असल्याचे सांगितले, तर प्रा. रामस्वरूप सिंह चौहान यांनी सांगितले, पिकांवर मारण्यात येणाऱ्या कीटकनाशकांमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम जाणवत आहेत. गोमूत्राने रोगप्रतिकार शक्ती वाढते, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. देशी गायींवर संशोधनासाठी स्वतंत्र संस्थेची गरज असल्याचेही चौहान यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय पांडुरंग भरीत, रघुवीर पाटसकर, मिलिंद देवल, रमेश कर्पे व राजेंद्र्र लुंकड यांनी करून दिला. सूत्रसंचालन बापू कुलकर्णी यांनी केले. व्यासपीठावर दादरा नगर हवेली मुक्तिसंग्राम समितीचे सचिव वसंतराव प्रसादे व शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल उपस्थित होते. (प्रतिनिधी)