शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजारांहून अधिक चारित्र्य पडताळणीचे अर्ज

By admin | Updated: January 29, 2017 00:35 IST

पोलीस आयुक्तालय : उमेदवारांची धावपळ; सर्व्हर डाउनची समस्या

नाशिक : महापालिका निवडणुकीत उमदेवारी करणाऱ्या उमेदवारांना पोलिसांकडील वर्तन व चारित्र्य पडताळणीचा दाखला आवश्यक आहे़ पोलीस आयुक्तालयाने या दाखल्यासाठी आॅनलाइन प्रकिया सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे साडेतीन हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत़ सायबर कॅफेतही इच्छुकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र असून, काही उमेदवारांना आॅनलाइन पद्धत क्लिष्ट वाटते आहे़  महापालिकेतील नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या बहुतांशी उमेदवारांना सोशल मीडियावरील अ‍ॅप्लिकेशन सोडता इंटरनेट वापराबाबत पुरेसे ज्ञान नाही़ त्यातच सायबर कॅफेचालकांना सर्व्हर डाउनची समस्या भेडसावत असून, चारित्र्य पडताळणी दाखल्यासाठी अर्ज करण्यास अडचणी येत आहेत़ त्यातच उमेदवारांकडे केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्यांची धावपळ वाढली आहे़  पोलीस आयुक्तालयातील वर्तन व चारित्र्य पडताळणी कार्यालयात उमेदवारांची गर्दी वाढली असून, आतापर्यंत तीन हजार ४०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केले आहेत, तर सर्व्हर डाउनची समस्या भेडसावत असल्याने आॅनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू होते़ या प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने तर काही उमेदवार आम्हाला त्वरित प्रमाणपत्र द्या, अशी मागणी करीत आहेत़  वर्तन व चारित्र्य दाखल्यासाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर प्रमाणपत्रासाठी दोन-तीन दिवसांचा कालावधी लागत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, तर काही उमेदवार सायबर कॅफे चालकाऐवजी पोलीस आयुक्तालयास प्राधान्य देत आहेत़ त्यामुळे आयुक्तालयातील या दाखल्यांसाठी स्वतंत्र विभागात इच्छुक उमेदवारांची गर्दी होते आहे़ (प्रतिनिधी)