शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सहाशे रुपयांचा अधिक भुर्दंड

By admin | Updated: October 25, 2015 22:55 IST

दिवाळीचा फराळ : महागाईमुळे पदार्थांचे दर भडकले

नाशिक : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई भडकल्याने त्याचा थेट परिणाम दिवाळीच्या फराळावर होणार आहे. तेल-तुपासह किराणा मालाचे दर प्रचंड वधारल्याने फराळाचे पदार्थही महागले असून, त्यामुळे यंदा एका कुटुंबाला साधारणत: सहाशे रुपयांचा अधिक भुर्दंड सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून तेल, तूप, डाळींचे दर भडकल्याने गृहिणींना चांगलीच कसरत करावी लागत आहे. दिवाळीचा सण पंधरवड्यावर आल्यामुळे आता घरोघरी फराळाच्या पदार्थांची लगबग सुरू झाली आहे; मात्र किराणा मालाच्या वाढत्या दरामुळे बजेट सांभाळताना गृहिणींची बरीच दमछाक होत आहे. शहरात अनेक बचत गटांच्या माध्यमातून फराळाचे पदार्थ तयार केले जातात. सध्या अनेक महिला नोकरी करीत असल्याने त्यांना फराळाचे पदार्थ घरी तयार करणे शक्य होत नाही. अशी कुटुंबे फराळाचे रेडिमेड पदार्थ बचत गटांकडून घेणे पसंत करतात; मात्र महागाईमुळे यंदा या पदार्थांचे दरही जवळपास दुपटीने वाढले आहेत. साधारणत: एका चौकोनी कुटुंबाने फराळाचे सगळे पदार्थ प्रत्येकी एक किलो या प्रमाणात घेतल्यास गेल्या वर्षी सुमारे १,४०० रुपये खर्च येत होता. त्यात आता यंदा सहाशे रुपयांनी वाढ झाली असून, तेवढ्याच पदार्थांसाठी यंदा दोन हजार रुपये खर्च येत आहे. (प्रतिनिधी)