नाशिक : पश्चिम विभागात निवडणूक कार्यालयाने ३४ मतदान केंदे्र संवेदनशील असल्याचे निर्देशित केले असून, यात प्रभाग क्रमांक २४ मधील १४ क्रिटिकल मतदान केंद्रांचाही समावेश आहे. या संवेदनशील व क्रिटिकल मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असून, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विभागातील ७, १२ व २४ या तीन प्रभागांमधून एकूण एक लाख नऊ हजार ९०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ व २४ साठी महापालिका निवडणूक मतदानप्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. विभागातील तिन्ही प्रभागांच्या १४२ मतदान केंद्रांवर एकू ण एक लाख नऊ हजार ९०२ मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आहे. यात प्रभाग क्रमांक ७ मध्ये १८ हजार ७७४ महिला व १७ हजार ३७९ पुरुषांसह ३६ हजार १५३ मतदार असून, प्रभाग १२ मध्ये १८,३८० महिला व १७,४६२ पुरुष मतदार आहेत. प्रभाग २४ मध्ये १९,९८४ महिला व १८,१२३ पुरुष मतदार असून, पश्चिम विभागातील एकूण १४२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक कार्यालयाला एकूण ३१२ मतदान यंत्रे व १५७ नियंत्रण यंत्रे प्राप्त झाली आहेत. यासर्व यंत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाली असून, मतदान यंत्र सीलबंद करून मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
लाखाहून अधिक मतदार बजावणार हक्क
By admin | Updated: February 21, 2017 01:08 IST