खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नानाजी मोरे, तर व्हा. चेअरमनपदी बापू शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.खामखेडा सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती. चेअरमन विश्वास शेवाळे व व्हा. चेअरमन यादवराव सोनवणे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. चेअरमनपदासाठी नानाजी मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यास सूचक विश्वास शेवाळे, तर अनुमोदक म्हणून सुनील शेवाळे होते. व्हा. चेअरमनपदासाठी बापू शेवाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यास सूचक म्हणून समाधान अहेर, तर अनुमोदन अरु ण शेवाळे यांनी दिले. नानाजी मोरे यांची चेअरमन म्हणून, तर व्हा. चेअरमन म्हणून बापू शेवाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी देशमुख यांनी जाहीर केले.निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. निवडणूक अधिकारी म्हणून देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना सस्थेचे सचिव संभाजी खेडकर व मदतनीस कडू शेवाळे यांनी मदत केली.यावेळी सरपंच संतोष मोरे, अण्णा पाटील, सोसायटीचे संचालक सुनील शेवाळे, विश्वास शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, दौलत बोरसे, अरुण शेवाळे, यादवराव सोनवणे, हौशिराम मोरे, अभिमन शेवाळे, उषा बोरसे, समाधान अहेर, माजी सरपंच शांताराम शेवाळे, दादाजी बोरसे, रमेश शेवाळे, दगा शेवाळे, रामदास शेवाळे, सुधाकर शिरोरे, शिवाजी बोरसे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
खामखेडा सोसायटी अध्यक्षपदी मोरे
By admin | Updated: October 28, 2016 00:17 IST