शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वसुलीपेक्षा थकबाकी अधिक

By admin | Updated: May 8, 2017 01:35 IST

जिल्हा बॅँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोेटींचे पीककर्ज वाटप केले असून, त्यापोटी अवघे १५७ कोटींचे कर्ज वसूल झाले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोेटींचे पीककर्ज वाटप केले असून, त्यापोटी अवघे १५७ कोटींचे (५.६० टक्के) कर्ज वसूल झाले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तरी त्यांनी भरलेली पीककर्जाची रक्कम त्यांना परत केली जाईल. मात्र तूर्तास पीककर्जाची थकबाकी भरून बॅँकेची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी थकबाकीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन बॅँकेने केले आहे. दरम्यान, जिल्हा बॅँकेत शिक्षकांच्या वेतनापोटी जिल्हा परिषदेकडून वर्ग झालेली ८५ कोटी ३५ लाखांची रक्कम स्टेट बॅँक आॅफ इंडियामध्ये चालू खात्यात जमा केली आहे. त्यातील ४३ कोटी जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये टी.टी.द्वारे वर्ग केली आहे. मात्र चलन तुटवड्यामुळे शिक्षकांना त्यांचे वेतन मिळत नसल्याचा दावा नरेंद्र दराडे यांनी केला आहे. जिल्हा बॅँकेत अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालक माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, माणिकराव कोकाटे, परवेज कोकणी, गणपतराव पाटील, धनंजय पवार आदि उपस्थित होते. त्यांनी जिल्हा बॅँकेच्या आर्थिक अडचणींबाबत माहिती दिली. १९९२ सालापासून शिक्षकांच्या वेतनापोटींचा सेवा कर जिल्हा बॅँक घेत नसल्याने सुमारे १८ ते २० कोटींचे या पोटी येणे सरकारकडे आहे. मात्र शिक्षकांनी वेतन मिळत नसल्याचे कारण देत जिल्हा बॅँकेसमोर वारंवार निदर्शने आणि ठिय्या आंदोलन केल्याने जिल्हा बॅँकेची बदनामी झाल्याने यापुढे शिक्षकांकडून त्यांच्या वेतनापोटींचा सेवाकर आकारण्याचा निर्णय जिल्हा बॅँकेने घेतल्याचा दावा संचालक माणिकराव कोकाटे यांनी केला. शिक्षकांच्या वेतनाची रक्कम यापूर्वीच स्टेट बॅँक आॅफ इंडियात जमा केलेली असल्याने आणि स्टेट बॅँकेकडे चलन तुटवडा असल्याने रोख पैसे मिळत नसल्याचे संचालक शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. बॅँकेच्या आजमितीस ३१२१ कोटींच्या ठेवी असून, ९४५ कोटींची गुंतवणूक बॅँकेने नाबार्डच्या निर्देशानुसार केलेली आहे. ३४१ कोटींच्या नोटा न स्वीकारल्याने आणि शिखरबॅँकेकडून वेळेवर कर्जाची रक्कम उपलब्ध होत नसल्यानेच बॅँकेची आर्थिक कोंडी झाल्याचा दावा संचालक परवेज कोकणी यांनी केला आहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी केल्यानेच राज्यातील शेतकरी त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पीककर्जाची परतफेड करीत नसल्याने सुमारे दोन हजारांहून अधिक कोटींचे पीककर्ज थकल्याचा दावा संचालकांनी केला आहे. (प्रतिनिधी)