शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकाच दिवसात चौदाशेहून अधिक चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 00:53 IST

नाशिक- शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा सुपर स्प्रेडर्सला वेळीच शोधून त्यावर उपचार करण्याची रणनीती महापालिकेने आखली आहे. त्या अंतर्गत तीस पथके तयार करण्यात आली असून त्यांनी आरटीपीसीआर आणि ँअटीजेन अशा चौदशे चाचण्या करण्यात आल्या आहेत. अर्थात, चाचण्या त्वरित करण्यात आल्या असल्या तरी प्रलंबित अहवालांची संख्या चार हजाराहून अधिक असल्याने या चाचण्यांचे अहवाल कधी मिळणार हा प्रश्नच आहे.

ठळक मुद्देसुपरस्प्रेडर: महापालिकेने नियुक्त केली तीस पथके

नाशिक- शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा सुपर स्प्रेडर्सला वेळीच शोधून त्यावर उपचार करण्याची रणनीती महापालिकेने आखली आहे. त्या अंतर्गत तीस पथके तयार करण्यात आली असून त्यांनी आरटीपीसीआर आणि ँअटीजेन अशा चौदशे चाचण्या करण्यात आल्या आहेत. अर्थात, चाचण्या त्वरित करण्यात आल्या असल्या तरी प्रलंबित अहवालांची संख्या चार हजाराहून अधिक असल्याने या चाचण्यांचे अहवाल कधी मिळणार हा प्रश्नच आहे.शहरात थेट नागरिकांशी संबंधीत असलेले व्यवसायिक किंवा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली तर त्यांच्यामुळे अन्य नागरिकांना देखील संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे असे व्यवसायिक किंवा कर्मचारी सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात. त्यामुळे त्यांची चाचणी करून संसर्ग रोखण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार दुकानदार, भाजीवाले, रिक्षा चालक इतकेच नव्हे तर सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरूवात करण्यात आली. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील तपासणी सुरू करण्यात आली असून त्यासाठी तीस पथके नियुक्त करण्यात आले आहे. मंगळवारी एका दिवसात १४०० कोरोना बाधीतांची चाचणी करण्यात आली आहे. अर्थात, साधारणत: चोवीस तासात चाचणीचा अहवाल प्राप्त होणे क्रमप्राप्त असले तरी सध्या सुमारे चार हजार अहवाल प्रलंबीत आहेत. त्यात नाशिक महापालिकेच्या १ हजार ६८ नमुन्यांचा देखील प्रलंबित अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेला जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून लवकरात लवकर अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.शहरातील बहुतांशी कोरोना चाचण्यांचे नमूने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र, तेथून अहवाल येण्यास विलंब झाल्याने महाालिकेने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत नमूने पाठवणे बंद केले असून त्याऐवजी मुंबईच्या हाफकिन्समध्ये नमूने पाठवले जात आहेत परंतु त्याची क्षमताही अवघी दोनशे नमुन्यांचीच आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालात महापालिकेचे सुमारे पाचशे नमूने तपासणी विना पडून आहेत. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रूग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढण्याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल