जिल्ह्यातील बाधित १२८ रुग्णांपैकी तब्बल ८९ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील तर ३५ रुग्ण नाशिक मनपा आणि ४ जिल्हाबाह्य क्षेत्रातील आहेत. तर दिवसभरातील ४ मृत्युमध्ये दोन बळी नाशिक मनपा तर दोन बळी नाशिक ग्रामीण भागातील आहेत. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.६४ असून, प्रलंबित अहवालांची संख्या ७२४ वर पोहोचली आहे. त्यात ३१८ नाशिक ग्रामीण, २१० मालेगाव मनपा तर नाशिक मनपा क्षेत्रातील १९६ नागरिकांच्या अहवालांचा समावेश आहे.
इन्फो
सिन्नरला नाशिक मनपापेक्षा अधिक रुग्ण
जिल्ह्यातील एकूण बाधितांपैकी ग्रामीणच्या ८९ रुग्णांमध्ये एकट्या सिन्नरचे बाधित प्रमाण ४६ म्हणजे निम्म्याहून अधिक आहे. सिन्नरच्या बाधितांची ही संख्या नाशिक मनपापेक्षाही ११ ने अधिक आहे. सिन्नरखालोखाल केवळ निफाड तालुक्यातही २३ रुग्ण बाधित असून या दोन तालुक्यांमुळे ग्रामीण भागातील बाधित संख्या शहरापेक्षाही अधिक येत आहे.