शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अकरावीच्या २५ टक्यांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 16:07 IST

अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.

ठळक मुद्देअकरावीच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता अनेकांची आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेशाला पसंती

नाशिक : अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर विशेष गुणवत्ता फेरी राबविण्यात येत असून या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरही शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या सुमारे २५ ते ३० टक्के जागा म्हणजेच जवळपास ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता दिसून येत आहे.नाशिक महानगर पालिका क्षेत्रात अकरावीच्या २३  हजार ८६० जागा असून आत्तापर्यंत २५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असली तरी बहूतांश विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीचे महाविद्यालच निवडल्याने अन्य जागा रिक्त राहिल्या आहेत. शहरातील सुमारे २३हजार ८६० जागांपैकी केवळ  साडेतेरा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून विशेष फेरीत ४ हजार १०७ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली असली तरी यातील २ ते अडीच हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विविध महाविद्यालयांधील सुमारे ८ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी नाशिक शहरात मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार तीन नियमित फेºया राबविण्यात आल्यानंतर चौथ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला पसंती दिल्याने या फेरीनंतरही शहरात अकरावीच्या ८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, विशेष फेरीच्या गुणवत्ता यादीत नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा कटआॅफ सर्वाधिक ८४ टक्के लागला. याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेचा कटआॅफ ९०.२० टक्के लागला.  पहिल्या तीन फेºयांच्या तुलनेत इतर महाविद्यालयांचे कटआॅफ खाली आले आहे. त्यामुळे आता अकरावी प्रवेशासाठी प्रथम तीन फेºयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी विशेष फेरीत अन्य महाविद्यालयांचे पर्याय निवडल्याचे दिसून येत असून या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १९ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य दिले असणार नामांकित महाविद्यालयांमधील रिक्त जागांवर प्रवेशासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना अजूनही संधी उपलब्ध होणार आहे.