शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पाचशेहून अधिक उमेदवारी अर्ज

By admin | Updated: February 3, 2017 01:30 IST

आज अखेरचा दिवस : राजकीय पक्षांना बंडखोरीची धास्ती

 नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.३) अखेरचा दिवस असून, गेल्या सात दिवसांत आतापर्यंत पाचशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बंडखोरीची धास्ती असल्याने मनसे वगळता अद्याप एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही. आॅनलाइन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या तीन हजाराच्या आसपास जाऊन पोहोचल्याने शुक्रवारी अवघ्या चार तासांत प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना गोंधळ उडण्याची शक्यता आहे.महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी सातवा दिवस होता. सात दिवस उलटून गेले तरी अद्याप मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची अधिकृत यादी घोषित केलेली नाही. मनसेने सायंकाळी आपल्या ५४ उमेदवारांची पहिली यादी घोषित करत आघाडी घेतली तर सेना-भाजपासह कॉँग्रेस-राष्ट्रवादीत उमेदवारीवरून अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या जात आहेत. गुरुवारी (दि.२) सहाही विभागमिळून ४२१ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या ५३० इतकी झाली आहे. राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारांची यादी घोषित न केल्याने पक्षाच्या माध्यमातून अर्ज दाखल करण्यास पंचाईत झाली. त्यामुळे उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल करतानाच पक्षाच्या नावानेही अर्ज दाखल करून ठेवले. गुरुवारी एकाचवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याने विभागीय कार्यालये गजबजली होती. (प्रतिनिधी)