शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तुळजा भवानी चौकात पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:33 IST

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र डेग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झालेली असतानाच सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. सिडको भागात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाचा संबंधित विभागाकडून मात्र योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सिडको : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र डेग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झालेली असतानाच सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. सिडको भागात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाचा संबंधित विभागाकडून मात्र योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आज शिवसेना नगरसेवक कल्पना पांडे यांनी परिसरात पाहणी करीत यास मनपाचा मलेरिया विभागच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.  सिडको विभागात सर्वसामान्य नागरिक वास्तव करीत असून, गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. दीपावली सणानंतर सिडको भागातील मोकळे मैदान व रस्त्याच्या कडेला ठिक ठिकाणी घाण व कचºयाचे ढीग साचले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे सिडको भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. तूळजा भावानी चौक या परिसरातच पन्नासहून अधिक रुग्ण असून, यात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही याकडे मनपाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू या आजाराबरोबर साथीच्या आजाराची लागण होऊ नये यासाठी मनपाच्या मलेरिया विभागाकडून कोणतीही दखल घेत जात नसून परिसरात नियमित फवारणीदेखील केली जात नाही. सिडकोतील तुळजा भवानी चौकातील उद्यानाची दयनीय अवस्था झाली आहे. तसेच उद्यानात गाजरगवत वाढलेले असून, याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीतदेखील अनेक दिवसांपासून पाणी साचलेले असल्याचे दिसून आले. याबाबत आज नगरसेवक कल्पना पांडे व माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे यांनी संपूर्ण तुळजा भवानी परिसरात पाहणी करून डेग्यूसदृशरुग्णांचीदेखील घरोघरी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी मलेरिया विभागाच्या कर्मचाºयांना-देखील तातडीने बोलावून याठिंकाणी फवारणी करण्यात आली.मनपाचा मलेरिया विभाग नावापुरताचमहापालिकेच्या वतीने सिडको भागात पेस्टकंट्रोलचा औषध फवारणी ठेक्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो, परंतु ठेकेदाराकडून याबाबत कोणतीही दखल घेतली जात नसून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाºया या ठेकेदाराचा ठेका त्वरित रद्द करून त्यास काळ्या यादीत टाकावे यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेणार.  - कल्पना पांडे, नगरेसवक