शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला रिपाईच्या वतीने मोर्चा, रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:04 IST

मनमाड : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपाई शहर शाखेच्या वतीने आज शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने दैनंदीन व्यवहार ठप्प झाले होते.

ठळक मुद्देआठवले यांच्यावर भ्याड हल्ला : इंदूर पुणे महामार्गावर वाहतुक ठप्प

मनमाड : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपाई शहर शाखेच्या वतीने आज शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने दैनंदीन व्यवहार ठप्प झाले होते.रिपाई शाखेच्या वतीने शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. रामदास आठवले आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणानून गेला होता.हातात निळे ध्वज व निषेधाच्या घोषणा देत हा मोर्चा शहरातून जाणाऱ्या पुणे इंदूर महार्मावर येउन पोहचला. या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले.या मुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वहातूक ठप्प झाली होती. असे भ्याड कृत्य करणाºया माथेफिरूवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच आठवले यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात यावी अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी मंडल अधिकारी कैलास चौधरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद मुळे दुकाने,खाजगी अस्थापना बंद असल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जानवत होता.सर्वत्र बंद असल्याने नागरिकांची गौरसोय झाली. शहरातील व्यापारी व नागरिकांनी या बंदमधे सहभाग घेउन बंद यशस्वी केला.रिपाई शहर शाखेकडून करण्यात आलेल्या या आंदोलनाला शिवसेना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, फुले शाहू आंबेडकर मुलनिवासी विचार मंच यांच्यासह अन्य पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला होता.या वेळी रिपाईचे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाउ अहिरे, गंगाभाउ त्रिभुवन, अनिल निरभवणे,दिनकर धिवर, कैलास अहिरे, दिलीप नरवडे, पी.आर. निळे, मोजेस साळवे,सुरेश श्ािंदे, गुरूकुमार निकाळे, प्रविण पगारे, रुक्मीणी अहिरे, कमल खरात,मंदा भोसले,पुष्पा गायकवाड, अरुणा जाधव,सुशिला धिवर, सुशिला राउत,नुतन गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.रिपाई युवा शाखेचे रेल्वे स्थानकावर निदर्शने...रिपाई युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करत रेल्वे स्थानक गाठले. येथील फलाट क्रमांक तीन वर घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.आठवले यांना धक्काबुक्की करण्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र युवक आघाडीचे वंदेश गांगुर्डे, अनिल संसारे, सोनू बागूल, रमेश जाधव,प्रविण जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.