शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

हाथरस घटनेच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:52 IST

नाशिक: उत्तरप्रदेशातील चंदपा, हाथरस व बलरामपूर येथील युवतींवर घडलेल्या बलात्कार निर्घृण खुनाच्या घटनांच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे 'आम्ही नाशिककर ' बॅनर खाली रविवारी (दि.४) आक्रोश मोर्चा काढत उत्तरप्रदेश पोलीस व सरकार विरोधात निषेध निषेध नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देपीडितेला न्याय मिळून देण्याची मागणी : आम्ही नाशिककर बॅनरखाली विविध संघटनांचे आंदोलन

नाशिक: उत्तरप्रदेशातील चंदपा, हाथरस व बलरामपूर येथील युवतींवर घडलेल्या बलात्कार निर्घृण खुनाच्या घटनांच्या निषेधार्थ छात्रभारती विद्यार्थी संघटनेतर्फे 'आम्ही नाशिककर ' बॅनर खाली रविवारी (दि.४) आक्रोश मोर्चा काढत उत्तरप्रदेश पोलीस व सरकार विरोधात निषेध निषेध नोंदविण्यात आला.वडाळा नाका परिसरातील महर्षी वाल्मिकी मंदिर येथून सुरु झालेल्या या मोर्चाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समारोप करण्यात आला. तत्पूर्वी हाथरस येथील पिडितेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून हाथरस येथील सामुहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कलमे लावण्याची मागणी करतानाच असे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टासमोर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याचप्रमाणे हाथरस पोलिसांनी केलेली कारवाई, तपास आणि कृती ही आरोपींपेक्षाही गंभीर आणि भयावह असल्याचे नमूद करतानाच पिडितेच्याअंत्यविधीची कृती समाजाचे मनोधैर्य खरच्चीकरण व भयभीत करणारी आणि पोलिस यंत्रणेवरची विश्वासार्हता गमावणारी असल्याने मुख्य आरोपींसोबतच तपास अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आंदोलकांचे निवेदन शासनाच्या शिफारसींसह राष्ट्रपतींना पाठवावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या मोर्चात राष्ट्रवादी विध्यार्थी काँगेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, छात्रभारतीचे राकेश पवार, अ‍ॅड. शरद कोकाटे, प्रिया ठाकूर, निशिकांत पगारे, सुरेश मारू, रणमाळे, सचिन भुसारे, निखील गुंजाळ, रोशन वाघ, राम सूर्यवंशी, देविदास हजारे, समाधान बागुल भूषण बोरसे स्वाती त्रिभुवन हरीश पवार सनी बंदावणे गोकुळ मेदगे हरीश दलोड जयंत विजयपुष्प आदी सहभागी झाले होते.नारी सन्मान मे नाशिककर मैदान मेहाथरस घटनेच्या निषेधार्थ नाशिककरांनी काढलेल्या मोर्चात सहभागी आंदोलकांनी 'नारी के सम्मान में,हम है मैदान मे', 'नो मोर रेप्स', 'रेप इज नॉट सेक्स, इट इज व्होईलन्स', बेटी दिल मे,बेटी वील मे' अशा घोषणांचे फलक उंचावून नागरिकांचे लक्ष वेधून घेत हाथरस घटनेचे गांभीर्य नागरिकांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

 

टॅग्स :hatkanangle-acहातकणंगलेCrime Newsगुन्हेगारी