शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा : गोणीमुक्त कांदा लिलाव सुरू करण्यासाठी संतप्त शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By admin | Updated: August 9, 2016 22:08 IST

सटाण्यात कडकडीत बंद

सटाणा : व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून, मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी सटाणा शहरासह तालुका बंद पुकारून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दोन दिवसांच्या आत शासनाने कठोर निर्णय घेऊन कांदा लिलाव पूर्ववत न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिला आहे.सोमवारी शिवसेनेचे नेते अरविंद सोनवणे व शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील यांनी सटाणा शहरासह तालुका बंदची हाक दिली होती. त्याला सटाणा, नामपूर, ताहाराबाद, लखमापूर, ब्राह्मणगाव, जायखेडा येथील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद ठेवला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतकरी नेते पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, शेतकरी संघटनेचे देवीदास पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे चारशे ते साडेचारशे शेतकऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शासन आणि व्यापाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणा देत ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला.यावेळी काही शेतकऱ्यांनी वाहनांवर कांदा फेकून संताप व्यक्त केला. तहसील आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन रामचंद्रबापू पाटील यांनी आपल्या भाषणात सरकार आणि व्यापारी यांच्यावर तोंडसुख घेतले.शासनाने कठोर भूमिका घेऊन तत्काळ खुल्या पद्धतीने कांदा लिलाव पूर्ववत करण्याची गरज असून, याबाबत येत्या दोन दिवसात तोडगा न काढल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल. त्याला शासनच जबाबदार असेल, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.देवीदास पवार यांनी तर थेट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोनलाल भंडारी यांनाच टीकेचे लक्ष केले. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सुरेश बागड, शैलेश सूर्यवंशी, काका रौंदळ, अरविंद सोनवणे, पोपट सोनवणे यांचीही यावेळी भाषण झाली.मोर्चात नानाजी दळवी, माधवराव सोनवणे, नीलेश सोनवणे, सुभाष अहिरे, मुंजवाडचे सरपंच गणेश जाधव, रत्नाकर सोनवणे, राजाराम सोनवणे, परेश पाठक, संजय पवार, प्रकाश निकम, गुलाब जाधव, दीपक रौंदळ, वसंत सोनवणे, परशराम अहिरे, धर्मा सोनवणे, पंकज सोनवणे, चेतन मोरे, प्रवीण अहिरे, सुभाष पाटील, राकेश सोनवणे, बबन सोनवणे, अशोक सोनवणे, वसंत सोनवणे, श्रीपाद कायस्त, भारत कटके, दादू सोनवणे, भैया रौंदळ, राजेंद्र देवरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(वार्ताहर)