शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात आशा स्वयंसेविकांचा भुजबळ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST

राज्यभरातील आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवार (दि. १५) पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र ...

राज्यभरातील आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवार (दि. १५) पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संपर्क कार्यालयावर मोर्चा दाखल होताच भुजबळांचे स्थानिक स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे मोर्चाला सामोरे गेले. यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन लोखंडे यांचेकडे देण्यात आले.

कोरोना कामाचा मोबदला म्हणून दरमहा १ हजार व गट प्रवर्तक यांना दरमहा ५०० रुपये देऊन शासन आर्थिक शोषण करत आहे. राज्य सरकारने प्रतिदिन ५०० रुपये याप्रमाणे मोबदला देऊन आशा व गट प्रवर्तकांचा सन्मान करावा, आशा पर्यवेक्षक यांना मागील थकीत मानधन त्वरित द्यावे, कोरोना आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी समता परिषदेचे प्रदेश प्रवक्ते संतोष खैरनार, ज्ञानेश्वर दराडे, संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा परदेशी, सविता आक्कर, एच. भजन, निशिगंधा पगारे, सुरेखा गायकवाड, स्वाती चव्हाण, सविता आहेर, सुमन लोखंडे यांसह आशा व आशा पर्यवेक्षक, गट प्रवर्तक मोठया संख्येने उपस्थित होते.

इन्फो

विमाकवच देण्याची मागणी

आशा स्वयंसेविकांना १८ हजार रुपये व गट प्रवर्तकांना २२ हजार प्रतिमहा वेतन देण्यात यावे, दरमहा कायम व निश्चित स्वरुपाची ३ हजार रुपये वाढ विनाविलंब देण्यात यावी, माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेच्या कामाचा मोबदला निश्चित करण्यात यावा, कोरोना बाधित झालेल्या आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विनामूल्य उपचार देण्यात यावा, आशा व पर्यवेक्षकांना विमाकवच देण्यात यावे आदी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत.

फोटो- १६ येवला आशा

आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा.

===Photopath===

160621\16nsk_50_16062021_13.jpg

===Caption===

फोटो- १६ येवला आशाआशा स्वंयसेविका व पर्यवेक्षक यांनी विविध मागण्यांसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा