येवला : येथील तालुका खरेदी- विक्री सहकारी संघात केंद्र शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेअंतर्गंत नाफेडच्या वतीने मूग खरेदीचा शुभारंभ आज सहायक निबंधक जितेंद्र शेळके, मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी साळुंके, केंद्रप्रमुख बोरसे, बाजार समिती चेअरमन उषाताई शिंदे, संचालक संजय बनकर, संघाचे चेअरमन राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव डी. सी. खैरनार, संघाचे व्हा. चेअरमन भास्कर येवले, संचालक दिनेश आव्हाड, शिवाजी धनगे, संतोष लभडे, भागुजी महाले, नाना शेळके, दगडू टर्ले, दामू पवार, दत्तात्रय वैद्य, अनिल सोनवणे, दत्ता अहेर, जनार्दन खिल्लारे, त्र्यंबक सोमासे, भागुनाथ उशीर, बाजार समिती संचालक गोरख सुरासे, नंदुशेठ आट्टल, संघाचे सचिव बाबासाहेब जाधव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
खरेदी-विक्र ी सहकारी संघात मूग खरेदी
By admin | Updated: September 15, 2016 00:21 IST