कळवण : कळवण नगरपंचायतला कायमस्वरु पी मुख्याधिकारी व शाखा अभियंता नसल्याने कळवणकरांच्या समस्या १७ महिन्यानंतरही कायमच असून, महिनाभरानंतर प्रभारी मुख्याधिकारी मिळाल्याने त्यांचे स्वागत, तर दोन महिन्यापासून प्रभारी अभियंत्यांचे दर्शन दुर्लभ असल्याने कार्यमुक्तचा ठराव कळवण नगरपंचायतच्या बैठकीत आज करण्यात आला. विशेष म्हणजे कळवण नगरपंचायत स्थापनेपासून एकही बांधकाम परवानगी देण्यात आली नसल्याचे सभेत सांगण्यात आले असल्याने नगरसेवकदेखील अवाक झाले.सभेच्या अध्यक्षस्थानी कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार होत्या. उपनगराध्यक्षा सौ रंजना पगार, गटनेते कौतिक पगार, नगरसेवक व नगरसेविका, प्रभारी मुख्याधिकारी लिलके , लेखापाल संजय आहेर आदी उपस्थित होते. नगरपंचायतकडून दिल्या जाणार्या बांधकाम परवानगी, ना हरकत दाखले आदी तत्सम कागदपत्रांची पुर्तता करु न सुध्दा दाखले देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्र ार कळवण नगरपंचायतच्या एका पदाधिकारीने केल्याने आज या विषयावर सभेत चर्चा होऊन संबधित प्रभारी अभियंता यांना कळवण नगरपंचायतमधून कार्यमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला. प्रभारी अभियंता हे सटाणा नगरपरिषदेचे अभियंता असल्याचे समजते. तर मिहन्यांपासून प्रभारी मुख्याधिकारीपद रिक्त होते. डी आर ठाकूर यांची बदली झाल्याने कळवण तहसीलचे नायब तहसीलदार लिलके यांच्याकडे प्रभारी मुख्याधिकारी पदाचा पदभार देण्यात आल्याने आजच्या सभेत त्यांचे स्वागत करण्यात येऊन सत्कार करण्यात आला. आजच्या सभेत शासकीय पत्रव्यवहार वाचन लेखापाल संजय आहेर यांनी यावेळी केले. व विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. सभेला उपनगराध्यक्षा सौ रंजना पगार, गटनेते कौतिक पगार, नगरसेवक अतुल पगार, साहेबराव पगार, मयुर बहीरम , जयेश पगार, बाळासाहेब जाधव, सौ अनिता जैन, सौ भाग्यश्री पगार, सौ रंजना जगताप , सौ अनुराधा पगार, सौ सुरेखा जगताप, मनोज देवरे आदी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. (वार्ताहर)
महिनाभरानंतर प्रभारी मुख्याधिकारी
By admin | Updated: August 12, 2016 22:22 IST