शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वारीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह

By admin | Updated: January 23, 2017 00:04 IST

दिंंड्या पोहोचल्या : त्र्यंबकेश्वर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम

त्र्यंबकेश्वर : श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त अंजनेरी जवळील ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज खेडगावकर यांच्या आश्रमासह विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पाचोरे वणी येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर कार्यकारी मंडळातर्फे देण्यात आली. सोमवारी (दि.२३) दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान दामोदर महाराज खेडगावकर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवारपासून (दि. १७) सुरू असलेल्या या कीर्तन सोहळ्यात स्वामी ब्रह्ममूर्ती पब्लिक स्कूलच्या मु्ख्याध्यापक मनीषा ताजणे, उस्मानाबादचे भागवत महाराज पानसरे, आळंदीचे वाडेकर, नाशिकचे महारूद्र शास्त्री तिडके, दुगावचे रामकृष्ण महाराज धोंडगे आदिंच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मंगळवारी (दि. २४) सकाळी ८ ते १० दरम्यान पुंडलिक महाराज खुरमुटे त्यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर संत, महंत व भाविकांचा सत्कार होऊन महाप्रसाद व भोेजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  चांदवड तालुक्यातील कन्हेरवाडी येथील ग्रामस्थांसह मुरलीधर मंदिरातील भजनी मंडळ, बळसाने (साक्री), खेडगाव (दिंडोरी) आदिंसह निफाड तालुक्यातील ग्रामस्थ हा कीर्तन सोहळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. रोज पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम काकडारती, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा, कीर्तन आदि कार्यक्रम होत आहेत. सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन भक्तमंडळातर्फे करण्यात आले आहे.लोणजाई माता दिंडी सोहळा  निफाड : विंचूर ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी नाशिकहून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाली. येथील लोणजाई माता व वै. दासोेबा महाराज काशीकर, भगरीबाबा, तुकाराम महाराज खेडलेकर, महेशानंद स्वामी, नानाजी महाराज वडनेरे व बाळासाहेब कानडे यांच्या आशीर्वादाने संत निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त विंचूर येथून पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते. सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे गजानन महाराज कवाडकर व निवृत्ती महाराज सदगीर यांचे कीर्तन होणार आहे. दिंडी सोहळा यशस्वीतेसाठी माणिक महाराज शास्त्री, अनिल बाळासाहेब कानडे, श्रीपत भीमाजी राऊत, कांतीलाल ढवण, सुधाकर जाधव, वसंत जाधव, पोपट जाधव, मधुकर दरेकर, वसंत भिवाजी कानडे, परशराम जेऊघाले, गोपाळ दरेकर,प्रणव दरेकर,बाबाजी डांगरे, काशिनाथ दरेकर आदि परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)