शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

माकडाचा उच्छाद

By admin | Updated: June 18, 2014 01:12 IST

cमीअंगाखांद्यावर खेळले, कडाडून चावले

वावी : तासभर गावात ग्रामस्थांच्या अंगाखांद्यावर खेळत पाऊणचार घेणाऱ्या माकडाने अचानक एकावर हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या रामपूर (पुतळेवाडी) येथे घडली.रामपूर येथे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माकडाचे आगमन झाले. मारुती मंदिरासमोर आलेले माकड पाहण्यासाठी गर्दी झाली. शेंगदाणे, गूळ, कांदे, फळे खाताना मर्कटलीला दाखवत त्याने ग्रामस्थांची करमणूक केली. काही उत्साही तरुणांनी त्याच्यासोबत हस्तांदोलन करताना फोटोसेशनही केले. माकड पाळीव असल्याचा समज झालेल्या ग्रामस्थांनी त्याला दुचाकीवर घेत फेरफटकाही मारण्याचा आनंद लुटला.याच वेळी वीज वितरण कंपनीत नोकरीस असलेल्या सुधाकर शंकर नरोडे आपल्या दुचाकीहून मारुती मंदिरासमोर आले. नरोडे घटनास्थळी थांबून मर्कटलीला पाहताना माकडाने त्यांच्या दुचाकीवर उडी मारुन पेट्रोल टाकीवर बैठक मारली. नरोडे यांनाही माकडाला सोबत घेऊन दुचाकीवर चक्कर मारण्याचा मोह आवरला नाही. नरोडे यांनी माकडला घराकडे नेऊन खाऊ पिऊ घातले. माकडाला आपला लळा लागल्याचा (गैर)समज नरोडे यांचा झाला. सर्वकाही आनंदात सुरु असतांना अचानक माकडाने नरोडे यांच्यावर हल्ला केला. नरोडे यांच्या उजव्या हाताला माकडाने कडाडून चावा घेतला. नरोडे यांच्या मदतीला धावलेले दशरथ पुंजा म्हस्के यांच्यावरही माकडाने हल्ला केला. यात म्हस्के किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी एकच आरडाओरड केल्याने माकड दूर पळाले. त्यानंतर ग्रामस्थांनी जखमी नरोडे यांना तातडीने वावी येथील डॉ. कमलाकर कपोते यांच्या रुग्णालयात आणून उपचार केले. (वार्ताहर)