शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांच्या अंमलबजावणीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:19 IST

सटाणा येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथे भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटोदा गावातील विविध विकासकामे, उपाययोजना व अंमलबजावणीची पाहणी करून सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

ठळक मुद्देसटाणा : नगराध्यक्ष मोरे यांची आदर्श गाव पाटोद्याला भेट

सटाणा : येथील नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी राज्यातील आदर्श गाव म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथे भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी पाटोदा गावातील विविध विकासकामे, उपाययोजना व अंमलबजावणीची पाहणी करून सरपंच भास्कर पेरे-पाटील यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.आदर्श गावासाठीचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारप्राप्त पाटोदा गावस राज्य शासनाचीही विविध पुरस्कारप्राप्त आहेत. शंभर टक्के हागणदारीमुक्त असलेल्या गावाची शंभर टक्के कर वसुली होते. प्रत्येक घरात तीन नळकनेक्शन असून, एकाद्वारे प्रत्येकास दरडोई वीस लिटर शुद्ध अक्वॉगार्डचे पाणी मोफत पुरविले जाते. उर्वरित नळांपैकी एका नळाने सौरऊर्जेवर तापलेले अंघोळीचे गरम पाणी तर दुसऱ्या नळातून वापरण्यासाठीचे पाणी घरोघरी पुरविले जाते. सर्व ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत मोफत धान्य दळून मिळते तसेच पापड, शेवया, कुरडया आदी वस्तूही मोफत करून मिळतात. गाव, परिसरात पर्यावरण रक्षणासाठी मोलाचे काम होत असून, घरोघरी वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य केले जाते तसेच स्वच्छतेसाठीही उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. शहर विकासाची कामे तसेच शहरवासीयांच्या सोयी-सुविधांसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी ही भेट मोलाची ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.राज्याच्या अलीकडच्या प्रत्येक ग्रामविकास मंत्र्यांनी पाटोद्याला भेट दिलेली आहे. देश-परदेशातील व राज्यभरातील ग्रामस्थ पाटोद्याला भेट देऊन पाहणी करतात. याच पद्धतीने नगराध्यक्ष मोरे यांनी भेट देऊन संपूर्ण गावभरातील विकासकामे, उपाययो जनांच्या अंमलबजावणीची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन जाणून घेतले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत