शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हेटाळणीमुळे मोनिका आथरेला अश्रू अनावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:53 IST

गेल्या महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक स्पर्धेत नाशिकची धावपटू मोनिका आथरे हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी वगळता कोणीही स्वागताला आले नाही, तसेच आॅफिसमध्येदेखील मला सहकर्मचाºयांकडून जाणीवपूर्वक हेटाळले गेले, अशी खंत धावपटू मोनिका आथरे हिने रविवारी एका हॉटेलमध्ये नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनतर्फे रविवारी (दि. ३) आयोजित कार्यक्रमात केली.

नाशिक : गेल्या महिन्यात लंडन येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक स्पर्धेत नाशिकची धावपटू मोनिका आथरे हिला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता न आल्याने नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी वगळता कोणीही स्वागताला आले नाही, तसेच आॅफिसमध्येदेखील मला सहकर्मचाºयांकडून जाणीवपूर्वक हेटाळले गेले, अशी खंत धावपटू मोनिका आथरे हिने रविवारी एका हॉटेलमध्ये नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशनतर्फे रविवारी (दि. ३) आयोजित कार्यक्रमात केली.नाशिकचे क्रीडाप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटना यांनी खेळाडूंची किंमत करायला शिकावे, ४२ किमी अंतर पूर्ण करणे काय असते याबाबत फक्त धावपटू तसेच क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनाच माहिती असल्याने इतरांनी ही प्रक्रिया समजून घेत खेळाडूंना अशी वागणूक देणे चुकीचे आहे, असे म्हणत मोनिका मनोगत व्यक्त करताना गहिवरून आले आणि कार्यक्रमातील वातावरण एकदम स्तब्ध झाले. यावेळी मोनिकाने आपलेच लोक पदक मिळाले म्हणून आपली हेटाळणी करत असतील तर अशा नागरिकांना काय म्हणावे, स्पर्धेहून परतल्यानंतर लगेचच जबाबदारी ओळखून कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली तरी मला स्पर्धेचा अनुभव कसा होता ? किंवा यश नाही मिळाले तरी काही हरकत नाही पुढे होणाºया स्पर्धेसाठी तरी शुभेच्छा देणे अपेक्षित होते, असे म्हणत आपल्या कार्यालयीन सहकाºयांवरदेखील मोनिकाने थेट नाराजी व्यक्त केली आणि कार्यालयातील सहकाºर्यांनी कसे टोमणे मारले आणि हेटाळले याचा अनुभव यावेळी मांडला. मोनिका आथरे हिने लंडन येथे झालेल्या स्पर्धेत २ तास ४९ मिनिटे आणि ५४ सेकंद अशी वेळ निर्धारित ४२ किमीचे अंतर पूर्ण करून विविध देशांतून सहभागी झालेल्या २६८ धावपटूंमधून ६४ वा क्रमांक मिळवला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोनिकाने केलेली खंत रास्त असून प्रत्येक खेळाडूचा तो हक्क आहे. स्पर्धेत यश आणि अपयश मिळाले तरीही खेळाडूंना सारखाच पाठिंबा मिळायला हवा, असे सांगताना यापुढे असे होणार नाही याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तर प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी अशी हेटाळणी करणाºया लोकांच्या बौध्दिक आणि शैक्षणिक पातळीचा विकास झालेला नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले तसेच स्पर्धेनिमित्त आपण देशाबाहेर असल्याने तुझे स्वागत करता आले नाही, असेही सिंग यांनी यावेळी सांगितले.स्पर्धेत अपयश मिळाल्यानंतर कोणीही आपली विचारपूस करत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करताना मोनिकाने उपस्थित खेळाडूंना जीवनात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो, स्पर्धेसाठी तयारी करताना मार्गात येणाºया प्रत्येक अडथळ्यावर मात करून पुढे जायला हवे, असे आवाहन केले. तसेच आगामी मे महिन्यात आॅस्ट्रेलिया येथे होणाºया कॉमनवेल्थ स्पर्धांसाठी तयारी सुरू असल्याचे मोनिका हिने यावेळी सांगितले.