शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

कांद्याच्या पैशांची पंतप्रधानांना मनीआॅर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:15 IST

निफाड : उन्हाळ कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याचे आर्थिक गणितच बिघडले आहे. घसरणाºया दरामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी शेतकरी बांधव रास्ता रोकोसारखी आंदोलने करीत असताना नैताळे येथील एका शेतकºयाने गुरुवारी (दि. २९) निफाड उपबाजार आवारात झालेल्या लिलावातून मिळालेल्या पैशांची मनीआॅर्डर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत शेतकºयांचा सार्वत्रिक उद्विग्नभाव प्रदर्शित केला.

ठळक मुद्देनैताळेच्या शेतकऱ्याची उद्विग्नता : भाव घसरल्याने वेधले लक्ष

निफाड : उन्हाळ कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याचे आर्थिक गणितच बिघडले आहे. घसरणाºया दरामुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी शेतकरी बांधव रास्ता रोकोसारखी आंदोलने करीत असताना नैताळे येथील एका शेतकºयाने गुरुवारी (दि. २९) निफाड उपबाजार आवारात झालेल्या लिलावातून मिळालेल्या पैशांची मनीआॅर्डर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवत शेतकºयांचा सार्वत्रिक उद्विग्नभाव प्रदर्शित केला.उन्हाळा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. उन्हाळ कांद्याचे दर एक रु पया किलोपर्यंत घसरले असल्याने उत्पादन खर्चही भरून निघत नाही. परिणामी, शेतकरी रस्त्यावर उतरत कांदा ओतून देऊन संतापाला वाट मोकळी करून देत आहे. मात्र, नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी आपल्या अनोख्या निषेधाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निफाड येथील उपबाजार आवारात गुरु वारी आणलेल्या कांद्याला अवघा १५१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने संजय साठे यांनी कांदा लिलावाचे आलेले हे पैसे चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनीआॅर्डर करून पाठवून दिले. संजय साठे यांनी आपला कांद्याचा ट्रॅक्टर निफाड बाजार समितीमध्ये विक्र ीसाठी आणला होता. यावेळी त्यांनी कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरवर बॅनर लावून त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बॅनरवर लिहिले होते, ‘शेतकरी-व्यापारी बंधूंनो आज कांदा उत्पादक शेतकºयांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून, त्याकडे कुणीही गांभीर्याने पाहत नाही. या शेतकºयांच्या व्यथा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळाव्यात या उद्देशाने मी आणलेल्या सर्व कांद्याचे पैसे आॅनलाइन मनिआॅर्डरद्वारे पंतप्रधानांना पाठविणार असून, मी जे काही करीत आहे हे कुठल्याही राजकीय हेतूने करीत नाही. तर केवळ शेतकºयांच्या व्यथा पंतप्रधानांना कळाव्यात हाच उद्देश आहे.’ निफाड उपबाजार येथे कांदा लिलाव होईपर्यंत बॅनर लावलेल्या साठे यांच्या ट्रॅक्टरकडे व्यापारी व शेतकरी कुतूहलाने पाहत होते.१११८ रुपयांची मनीआॅर्डरलिलावात साठे यांच्या कांद्याला १५१ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यांना कांद्याचे एकूण १०६४ रु पये मिळाले. त्यानंतर साठे यांनी थेट टपाल कार्यालय गाठले. कांदा लिलावातून आलेले १०६४ रु पये आणि त्यात स्वत:च्या खिशातून ५४ रु पये घालून एकूण १११८ रु पये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला पाठवून दिले. अकरावा महिना आणि सन २०१८ साल यामुळे त्यांनी १११८ रुपयाची रक्कम पंतप्रधानांना पाठविल्याचे सांगितले.