शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास सापडला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:57 IST

दिवाळीपूर्वीच कर्जमाफी प्रमाणपत्र धरून फोटोसेशन झालेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा पैसा प्रत्यक्ष जमा होण्यास मुहूर्त सापडला आहे. मंगळवारी (दि.३१) जिल्हा बॅँकेत दीड लाख शेतकºयांपैकी ८७९ शेतकºयांच्या प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे सुमारे तीन कोेटी ७० लाखांचा निधी जमा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नाशिकच नव्हे तर अहमदनगर जिल्हा बॅँकेसह राज्यातील अन्य जिल्हा बॅँकेतही कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्याचे समजते.

नाशिक : दिवाळीपूर्वीच कर्जमाफी प्रमाणपत्र धरून फोटोसेशन झालेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा पैसा प्रत्यक्ष जमा होण्यास मुहूर्त सापडला आहे. मंगळवारी (दि.३१) जिल्हा बॅँकेत दीड लाख शेतकºयांपैकी ८७९ शेतकºयांच्या प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे सुमारे तीन कोेटी ७० लाखांचा निधी जमा झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नाशिकच नव्हे तर अहमदनगर जिल्हा बॅँकेसह राज्यातील अन्य जिल्हा बॅँकेतही कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्याचे समजते.  दरम्यान, ज्या ८७९ शेतकºयांच्या नावे ही पावणे चार कोटींची रक्कम जिल्हा बॅँकेत वर्ग झाली आहेत. त्यात काही तांत्रिक चुका असून, यादीत काही शेतकºयांची चुकीची नावे व दीड लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने यांसदर्भात मंत्रालयातील कर्जमाफीसाठी खास सुरू केलेल्या आयटी विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे.  नाशिक जिल्ह्णातून कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख ६० हजारांहून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा विचार करता जिल्हा बॅँकेने दीड लाखांच्या आतील सुमारे ९० हजार तसेच दीड लाखांच्या  पुढील मात्र कर्जमाफीस पात्र अशा सुमारे २८ ते ३० हजार व नियमित कर्जफेड करणाºया २० हजारांहून अधिक अशा सुमारे १ लाख ३८ हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी १ ते ६ विहीत नमुन्यात माहिती मुंबईला पाठविली होती. या यादीत नऊ वर्षांसाठी कर्ज घेणाºया कर्जदार शेतकºयांचीही नावे विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात आली होती. मंगळवारी (दि.३१) राज्य स्तरावरून नाशिक जिल्हा बॅँकेत ८७९ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी सुमारे ३ कोटी ७० लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेत वर्ग झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.तांत्रिक चुकांमुळे अडचणजिल्हा बॅँकेत मंगळवारी कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे समोेर आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार एकाच कुटुंबात दीड लाखांच्या वर कर्जमाफीची रक्कमे देता येत नसताना काही कुटुंबांच्या नावे १ लाख ९० हजारांच्या आसपास रक्कम दिसत असल्याचे कळते. तसेच काही शेतकºयांच्या नावांमध्ये व आडनावांमध्ये गफलत असल्याने यासंदर्भात शासन स्तरावरून जिल्हा बॅँकेने मार्गदर्शन मागविले आहे.