शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कादवातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग

By admin | Updated: January 9, 2016 23:59 IST

कादवातर्फे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग

दिंडोरी : नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याने सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाची प्रतिटन रु. २११७ प्रमाणे एफआरपीची पूर्तता केली असून, उर्वरित रुपये ६१ प्रमाणे रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले. मागील वर्षी उसाची एफआरपी रु. २११७ होती. गेल्या वर्षभरात साखरेचे भाव कमालीचे खाली आल्याने एफआरपीची रक्कम पूर्ण करणे कारखान्यास अत्यंत अडचणीचे झाले होते. तरीही कारखान्याने ऊस उत्पादकांना दिलेल्या आश्वासना नुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक उपलब्धतेनुसार यापूर्वीच रु . २०५६ अदा केले होते. आता रु. ६१ प्रमाणे एकूण रु. २११७ रक्कम अदा झाली आहे. या वर्षीचा गळीत हंगाम चालू आहे. ६३ दिवसात कारखान्याने १,०१,४२९ मे. टन ऊस गाळप केला असून, १,०३,७५० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखर उतारा ११.१४ टक्के आहे. हंगामात कारखान्याचे पुरेशा प्रमाणात ऊसतोडणी मजूर असून, कार्यक्षेत्रात पाणी कमी असल्याची जाणीव संचालक मंडळास आहे. त्यामुळे गेट केनचा ऊस कमी करून कार्यक्षेत्रातील ऊसतोडणीला प्राधान्य दिले आहे. जास्तीत जास्त ऊसतोडणी मजूर कार्यक्षेत्रात वाढविण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातून दररोज सुमारे १७५० मे. टन ऊस गाळपास येतो व गेटकेनचा सुमारे १५० मे. टनापर्यंत ऊसपुरवठा होतो. ऊसतोडणी कार्यक्र माचे काटेकोर नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार ऊसतोड सुरू आहे. सर्व सभासदांच्या उसाची वेळेवर तोडणी होईल. कारखान्याची गाळप क्षमता १२५० मे. टन असूनसुद्धा दैनंदिन १८०० ते १९०० मे. टनापर्यंत उसाचे गाळप होत आहे. त्यामुळे सभासदांनी कोणत्याही प्रकारे ऊसतोडणीस घाई करू नये व कारखान्यास सहकार्य करावे. शासनाने उसाचे दर निश्चित केले असून, त्यात दरवर्षी वाढ होत आहे. तरी सर्व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन श्रीराम शेटे यांनी केले आहे. यावेळी व्हाइस चेअरमन उत्तम भालेराव, संचालक मंडळ, प्रभारी कार्यकारी संचालक उपस्थित होते. (वार्ताहर)