शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उमराणेत आता मालविक्र ीचे पैसे रोखीने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:35 IST

उमराणे : येथील बाजार समिती प्रशासन व व्यापारी असोसिएशनने दि. १ जूनपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने देण्याच्या आश्वासनानुसार शुक्रवारपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने मिळणार असल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.

उमराणे : येथील बाजार समिती प्रशासन व व्यापारी असोसिएशनने दि. १ जूनपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने देण्याच्या आश्वासनानुसार शुक्रवारपासून शेतमाल विक्रीचे पैसे रोखीने मिळणार असल्याची माहिती सभापती राजेंद्र देवरे यांनी दिली आहे.गेल्या दोन तीन महिन्यांपासून उमराणे बाजार समितीत मालविक्रीचे पैसे धनादेशद्वारे मिळत होते, परंतु या काळात व्यापाऱ्यांचे धनादेश बाउन्स होत असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला होता. शेतकºयांचे पैसे मिळावेत यासाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावर उपनिबंधकांनी बाजार समिती प्रशासनाला कडक निर्देश देत ज्या व्यापाºयांकडे शेतकºयांचे पैसे व बाजार समितीची देखभाल फी थकीत आहे अशा व्यापाºयांची लिलावात बोली बंद करण्यात येऊन निर्धारित वेळेत पैसे न दिल्यास कलम ५७ इ नुसार त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश बाजार समितीला देण्यात आले आहेत. महिनाभरापूर्वी बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन व शेतकरी बांधवांची बैठक बोलविण्यात आली होती. शेतकरी बांधवांना त्यांच्या मालविक्रीचे पैसे रोखीने मिळावेत या शेतकºयांच्या मागणीनुसार बाजार समिती प्रशासनाने व्यापारी बांधवांना विश्वासात घेऊन मालविक्रीचे पैसे रोखीने होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.