मालेगाव : संगमेश्वरातील जगताप गल्लीत राहणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्या किशोर कापसे याच्याविरुद्ध छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. काल सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. पीडित मुलीने फिर्याद दिली. ती दहावीचा पेपर देण्यासाठी श्रीरामनगरातील शिवाजी जिमखान्या-जवळून जात असताना किशोर कापसे याने तिचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार खोडके करीत आहेत.
मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 00:07 IST