शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्कराकडून महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:14 IST

लोहोणेर : येथील वाळू तस्कर व सद्या तडीपारीचे आदेश असलेला स्वप्नील (भैय्या) निकम याने येथील उच्चभ्रू समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी लोहोणेर गावात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.२२) लोहोणेर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

ठळक मुद्दे लोहोणेर : संतप्त ग्रामस्थांचा कडकडीत बंद; पोलिसांना निवेदन

लोहोणेर : येथील वाळू तस्कर व सद्या तडीपारीचे आदेश असलेला स्वप्नील (भैय्या) निकम याने येथील उच्चभ्रू समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी लोहोणेर गावात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.२२) लोहोणेर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.दरम्यान सकाळी येथे जमलेल्या जमावाकडून मिरच्या भैय्या याच्या अतिक्रमीत जागेवर असलेल्या आॅफिसची (पत्र्याच्या शेड) मोडतोड व जाळपोळ करण्यात आली. तसेच पोलीस उप निरीक्षकांची भेट घेऊन भैय्या निकम याला अटक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.भैय्या निकम याने एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या आधी सुद्धा एकदा सदर प्रकार घडला असता त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. याचा गैरफायदा घेत पुन्हा सदर प्रकार घडल्याने लोहोणेर गावात तीव्र प्रतिक्रि या उमटल्या. व याचा निषेध म्हणून सोमवारी लोहोणेर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान संतप्त झालेल्या काही जमावाने भैय्या निकम याच्या आॅफिसची (पत्र्याच्या शेड) जेसीबीच्या सह्याने मोडतोड करीत जाळपोळ केली.या घटनेदरम्यान देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील राजपुत हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोहोणेर गावातील संतप्त नागरिकांच्यावतीने संबधित आरोपीस अटक करून कडक शासन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. दरम्यान दुपारी लोहोणेर गावातील सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले. या घटनेचा सर्वच स्तरातून कडक शब्दात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.